18 January 2019

News Flash

रणवीरचं नवं प्रेम पाहिलं का?

तुम्हाला माहितीये का, सध्याच्या घडीला रणवीरच्या आयुष्यात नव्या रुपात प्रेम आलं आहे. खुद्द रणवीरनेच त्याविषयीची कबुली दिली.

रणवीर सिंग, Ranveer Singh

Bollywood actor Ranveer Singh. अभिनेता रणवीर सिंगच्या आयुष्यात असणारं प्रेम असं जरी म्हटलं तरीही अनेकजण हे वाक्य पूर्ण करत अभिनेत्री दीपिका पदुकोणचं नाव घेतात. पण, तुम्हाला माहितीये का, सध्याच्या घडीला रणवीरच्या आयुष्यात नव्या रुपात प्रेम आलं आहे. मुळात खुद्द रणवीरनेच त्याच्या या प्रेमाची कबुली देत फेसबुक अकाऊंटवरुन त्याच्या प्रेमाची कबुली दिली आहे.

तुम्हीही पेचात पडलात ना, आता रणवीर कोणाच्या प्रेमात पडलाय हाच प्रश्न तुमच्या मनात घर करतोय ना? जास्त विचार करण्याची गरज नाहीये, कारण रणवीर सध्या कोणा एका व्यक्तीच्या नव्हे तर ठिकाणाच्या प्रेमात आहे. ते ठिकाण म्हणजे स्वित्झर्लंड. स्वित्झर्लंड टुरिझमतर्फे २०१८- १९ या वर्षासाठी एक नवी जाहिरात आणली आहे. ज्यामध्ये रणवीर सिंग या सुरेख अशा देशात फिरण्याचा मनमुराद आनंद घेताना दिसत आहे. शिवाय या व्हिडिओमध्ये त्याच्या अभिनय कौशल्यापासून ते नृत्यकौशल्यापर्यंत बऱ्याच गोष्टींची झलकही पाहायला मिळत आहे.

Monsoon Trekking : ट्रेकिंगला जाताय, ‘या’ गोष्टी अवश्य ध्यानात ठेवा

रणवीरचं या देशावर असणारं प्रेम याआधीच त्याच्या विविध सोशल मीडिया पोस्टमधून पाहायला मिळालं होतं. त्यातच आता प्रदर्शित करण्यात आलेला हा व्हिडिओ अनेकांचच लक्ष वेधत आहे. ज्यामध्ये रणवीर सिंग स्वित्झर्लंडमधील काही प्रेक्षणीय स्थळांपासून ते अगदी बर्फाच्छादित डोंगररांगांमध्ये धमाल करताना दिसत आहे. मुख्य म्हणजे स्वित्झर्लंड टुरिझमच्या निमित्ताने रणवीरने नेहमीच या देशाचा सुरेख चेहरा पर्यंटकांसमोर आणत एका अर्थी भारतीय पर्यटकांनाही त्याने या देशाशी जोडलं आहे.

First Published on June 13, 2018 3:19 pm

Web Title: bollywood actor ranveer singh is in love with switzerland watch video