News Flash

‘तो माणूस नव्हे हैवान होता’

..काय माणूस होता तो

रणवीर सिंग

‘बॅण्ड बाजा बारात’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत अभिनेता रणवीर सिंगने प्रेक्षकांची मनं जिंकली. रणवीरचा नेहमीचा दिलखुलास अंदाज आणि माध्यमांसमोरील त्याचा वावर नेहमीच चर्चेचा विषय ठरतो. त्यासोबतच त्याच्या मुलाखतीही विशेष गाजतात. रणवीरची अशीच एक मुलाखत लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मुलाखतीत रणवीरने त्याच्या वाटयाला आलेली प्रसिद्धी, प्रेम, रिलेशनशिप्स आणि त्याची आतापर्यंतची कारकीर्द अशा चौफेर विषयांवर भाष्य केलं आहे.

‘जिओ फेमसली फिल्मफेअर’ या शोचा प्रोमो सध्या चांगलाच गाजत असून, या मुलाखतीत रणवीरने त्याच्या आगामी चित्रपटाबद्दलही काही माहिती दिली आहे. रणवीर सध्या संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘पद्मावती’ या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. त्यामुळे बऱ्याच कार्यक्रमांना गेल्यावर त्याला ‘पद्मावती’विषयीचे काही प्रश्न विचारले जातात. या मुलाखतीतही रणवीरला तो साकारत असलेल्या ‘अलाउद्दीन खिलजी’ या भूमिकेविषयी विचारलं तर तो म्हणाला, ‘काय माणूस होता तो (अलाउद्दीन खिलजी). त्याची कृत्यं पाहता तो असं काही करु शकतो याची कल्पनाही होत नाहीये. तो एक माणूस नसून हैवानच आहे.’

या मुलाखतीत रणवीरने ‘पद्मावती’तील भूमिकेविषयी बरीच माहिती शेअर केली. ‘प्रत्येक वेळी भूमिकेसाठी तयार होताना मागच्या वेळेपेक्षा आपण आणखी वाईट कसं वागू शकतो याचाच प्रयत्न मी करायचो’, असं रणवीर म्हणाला. त्याने मुलाखतीत उभं केलेलं अलाउद्दीन खिलजीचं पात्रं पाहता आता तो या भूमिकेला कितपत न्याय देतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. ऐतिहासिक काळ साकारण्यात येणाऱ्या या चित्रपटामध्ये अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि शाहिद कपूरसुद्धा झळकणार आहेत.

वाचा: ..म्हणून ‘रामलीला’च्या सेटवर रडली दीपिका

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 25, 2017 4:53 pm

Web Title: bollywood actor ranveer singh on playing alauddin khilji in padmavati directed by sanjay leela bhansali watch video
Next Stories
1 एसएस राजामौलीच्या चित्रपटाची कथा चोरल्याचा ‘राबता’वर आरोप
2 कपिलच्या शोमध्ये क्रिकेटर्सची विनोदी खेळी
3 प्रियांका चोप्रा कट्टर भारतीय, प्रश्नोत्तरावेळी दिलेली उत्तरं तर पाहा…
Just Now!
X