X

रणवीरच्या घरी लग्नाची तयारी सुरू

दीप- वीरने आपल्या लग्नाबाबत पुरेपूर गोपनियता बाळगली असून हा सोहळा अत्यंत खासगी व्हावा असा त्यांचा प्रयत्न आहे.

अभिनेता रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार असून त्याची तयारी सुरू झाली आहे. नोव्हेंबर महिन्याच्या २० तारखेला दीप-वीर लग्नगाठ बांधणार आहेत. लग्नासाठी दोनच महिने शिल्लक असताना आता रणवीरच्या घराच्या पुनर्रचनेचं काम हाती घेण्यात आलं आहे.

‘डेक्कन क्रॉनिकल’ने दिलेल्या वृत्तानुसार, लग्नानंतर दीपिका- रणवीर याच घरात राहायला जाणार असल्याने त्याच्या पुनर्रचनेचं काम करण्यात येत आहे. त्यामुळे पुढील आठवडाभर रणवीर मुंबईतल्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये राहणार आहे.

लग्नाची तारीख ठरवण्यासाठीच रणवीर आणि दीपिकाने सर्वाधिक वेळ घेतला. आपल्या लग्नात सर्व गोष्टींचं नियोजन अगदी सुरेख पद्धतीने व्हावं असाच त्यांचा अट्टहास आहे. लग्न समारंभाला दोघांच्याही कुटुंबातले मोजकेत तीस जण उपस्थित असणार अशी माहिती आहे. दीप- वीरने आपल्या लग्नाबाबत पुरेपूर गोपनियता बाळगली असून हा सोहळा अत्यंत खासगी व्हावा असा त्यांचा प्रयत्न आहे. यासाठीच त्यांच्या लग्नसोहळ्यात पाहुण्यांना मोबाईलसुद्धा नेण्यास बंदी आहे.

वाचा : करिना म्हणते, दुसऱ्या बाळाचा विचार सुरू पण..

२० नोव्हेंबर रोजी इटलीतल्या लेक कोमो या नयनरम्य ठिकाणी दीप- वीरचा विवाहसोहळा पार पडणार आहे. आयुष्यातील हे सुरेख क्षण अविस्मरणीय व्हावे आणि त्याचे खासगीपण जपले जावे, हा दोघांचाही प्रयत्न आहे.