News Flash

VIDEO : अन् चाहतीच्या मदतीस धावला रणवीर

त्याची एक झलक टीपण्यासाठी फक्स माध्यमंच नव्हे, तर चाहत्यांचीही तोबा गर्दी पाहायला मिळाली.

रणवीर सिंग

अभिनेता रणवीर सिंग सोशल मीडियाच्या माध्यमातून जितक्या जास्त प्रमाणात चाहत्यांशी संवाद साधतो, तितक्याच जास्त प्रमाणात तो विविध कार्यक्रमांना गेल्यावरही आपल्या चाहत्यांची आवर्जुन भेट घेतो. अशाच एका कार्यक्रमाच्या निमित्ताने रणवीर मुंबईत होता, ज्यावेळी त्याच्या भोवती चाहत्यांनी प्रचंड घोळका केला. कोणी सेल्फी काढण्यासाठी, कोणी त्याला हात मिळवण्यासाठी असं प्रत्येकजण त्याच्यापाशी पोहोचण्याचा प्रयत्न करत होतं. यामध्ये काही तरुणींनाही पाहायला मिळालं. पण, या गर्दीत काही पुरुष चाहत्यांनी धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली. हे लक्षात येताच खुद्द रणवीरनेच त्यांना थोडं दूर जाण्यास सांगितलं.

सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आलेल्या एका व्हिडिओमध्ये हे सर्व पाहायला मिळत आहे. एक चाहती ज्यावेळी रणवीरसोबत सेल्फी काढण्यासाठी आली, तेव्हा गर्दीचा लोटच जणू रणवीरच्या दिशेने आला. त्या, चाहतीच्याच दिशेने ही गर्दी आल्याचं कळताच रणवीरने त्याच्या पुढे असणाऱ्या एका चाहत्याला विनम्रपणे थोडं दूर राहण्यास सांगत परिस्थिती सावरुन नेली. मुख्य म्हणजे जितक्या चाहत्या रणवीरसोबत सेल्फी काढण्यासाठी येताना दिसल्या, त्यांच्यासोबत तो मोठ्या आदराने वागत असल्याचंही पाहायला मिळालं.

पाहा : Loveratri Trailer : ‘लवरात्री’तून पाहता येणार नौरात्रोत्सव आणि प्रेमाचे अनोखे रंग

रणवीरच्या वाट्याला आलेल्या लोकप्रियतेचं उदाहरण यावेळीसुद्धा पुन्हा एकदा पाहायला मिळालं. यावेळी त्याची एक झलक टीपण्यासाठी फक्स माध्यमंच नव्हे, तर चाहत्यांचीही तोबा गर्दी पाहायला मिळाली. सध्या बी- टाऊनचा हा लाडका अभिनेता त्याच्या खासगी आयुष्यामुळेही बराच चर्चेत आहे. अभिनेत्री दीपिका पादुकोणसोबतचं त्याचं नातं आता सर्वज्ञात झालं असून, नोव्हेंबर महिन्यात ते विवाहबंधनात अडकणार असल्याचंही म्हटलं जात आहे. त्यामुळे या गोष्टीकडेही अनेकांचच लक्ष लागून राहिलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 10, 2018 8:46 am

Web Title: bollywood actor ranveer singhs female fans mobbed by unruly crowd he only comes to rescue
Next Stories
1 व्यावसायिकदृष्टय़ा यशस्वी चित्रपट अनुदानासाठी अपात्र ठरणार !
2 फ्लॅशबॅक : दम मारो दम…
3 माझे सीनिअर दोस्त – संकर्षण कऱ्हाडे (सेलिब्रिटी लेखक)
Just Now!
X