Donald Trump Kim Jong Un summit. सध्याच्या घडीला संपूर्ण जगाचं लक्ष कोणत्या गोष्टीकडे लागून राहिलं असेल तर ती गोष्ट म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांची भेट. आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रचंड चर्चेत असणाऱ्या या भेटीवर साऱ्या जगाच्या नजरा खिळल्या आहेत. अशा या बहुचर्चित घटनेविषयी कलाविश्वातही कुतूहल पाहायला मिळत आहे, असं म्हणावं लागेल. पण, हे कुतूहल आहे तरी कोणत्या प्रकारचं याचा काहीच नेम लागू शकला नाही.

राजकीय पटलावरील या अत्यंत महत्त्वाच्या घडामोडीविषयी ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते ऋषी कपूर यांनी ट्विट करत चक्क किम जोंग उन यांचं कौतुक केलं आहे. पण, त्यांनी नेमकं हे कौतुक का बरं केलं असावं, हाच प्रश्न अनेकांच्या मनात घर करतोय. ऋषी कपूर यांचं ट्विट पाहून त्यांच्या या कौतुकाच्या स्वराचा अंदाज लावता येत आहे.

‘त्या ३३ वर्षीय कोरियन व्यक्तीला मी सलाम करू इच्छितो, ज्याला अमोरिकेच्या ७१ वर्षीय राष्ट्राध्यक्षांची भेट घ्यायला मिळतेय. तुझं कौतुक व्हायला हवं किम’, असं कपूर यांनी ट्विटमध्ये लिहिलं. त्यासोबतच त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना आपल्या आणि अमेरिकन अडल्ट स्टार स्टॉर्मी डॅनिअल्सच्या वतीने वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या. या उपरोधिक ट्विटमध्ये त्यांनी अमेरिकन जनतेला उद्देशून लिहिलं, तुम्ही एका विदुषकाचीच निवड करुन दिली आहे. त्यामुळे आता सर्कशीचा खेळ पाहण्यासाठी तयार राहा.

वाचा : North Korea : जाणून घ्या हुकूमशहा किम जोंग उनचा उत्तर कोरिया नेमका आहे तरी कसा

वाचा : FIFA World Cup 2018 Couple Goals: ‘हे’ फुटबॉलप्रेमी दाम्पत्य दहावा वर्ल्डकप पाहण्यासाठी सज्ज, पण…

ऋषी कपूर यांनी केलेली ही टिवटीव पाहता आता सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असणारे अमेरिकन राष्ट्राध्यक्ष त्यांच्या या ट्विटला काही उत्तर देणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान, स्टॉर्मीचा आपल्या ट्विटमध्ये उल्लेख करत कपूर यांनी एका वेगळ्याच विषयाला वाचा फोडली असं म्हटलं जात आहे.