14 October 2019

News Flash

जेनेलियाच्या वाढदिवशीच रितेशने केला त्याच्या ‘खास मैत्रिणी’च्या नावाचा उलगडा

सर्वत्र 'फ्रेंडशिप डे'च्याच चर्चा सुरु असताना अभिनेता रितेश देशमुख याचं ट्विटही चांगलच चर्चेत आलं होतं.

जेनेलिया देशमुख, genenlia

सेलिब्रिटी जोडप्यांच्या यादीत चाहत्यांना नेहमीच कपल गोल्स देण्यासाठी काही जोड्यांच्या नावाला पसंती देण्यात येते. अशा या यादीत अग्रस्थानी असणारं नाव म्हणजे, रितेश देखमुख आणि जेनेलिया डिसूझा. हिंदी आणि मराठी अशा दोन्ही कलाविश्वांमध्ये या जोडीवर नेहमीच सर्वांच्या नजरा खिळतात. मग तो या कलाविश्वातील त्यांचा प्रवास असो किंवा मग एखाद्या खास दिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देणं असो. रितेश आणि जेनेलिया नेहमीच सर्वांचं लक्ष वेधतात.

सर्वत्र ‘फ्रेंडशिप डे’च्याच चर्चा सुरु असताना अभिनेता रितेश देशमुख मात्र एका खास दिवसाचा आनंद साजरा करत होता. तो दिवस म्हणजे त्याची पत्नी जेनेलिया देशमुख हिचा वाढदिवस. जेनेलियाच्या वाढदिवसाच्याच निमित्ताने रितेशने सोशल मीडियावर सुरेख अशी पोस्ट लिहिली. याच पोस्टच्या माध्यमातून त्याने आपल्या खास मैत्रिणीच्या नावावरुनही पडदा उचलला. “माझ्या सर्वात खास आणि जवळच्या मैत्रिणीला, माझी ताकद, माझं सर्वस्व आणि माझी ‘बायको’, तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुझ्यासाठी खुप साऱ्या भेटवस्तू वाट पाहात आहेत’, असं त्याने लिहिलं. तर, आणखी एका ट्विटमध्ये त्याने जेनेलियाचा उल्लेख ‘लेडी बॉस’, असाही केला आहे. ज्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांनीच तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात सुरुवात केली.

Friendship day 2018 : प्रवासाने शिकवलेली मैत्री… माणसांशी आणि निसर्गाशी

रितेश आणि जेनेलिया या दोघांनीही एकाच वेळी अभिनय क्षेत्रातील कारकिर्दीला सुरुवात केली होती. ज्यानंतर बरीच वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. विवाहबंधनात अडकल्यानंतर जेनेलियाने कलाविश्वातून काढता पाय घेतल, कुटुंबाकडे लक्ष देण्यास प्राधान्य दिलं.

First Published on August 6, 2018 2:04 pm

Web Title: bollywood actor riteish deshmukh shares lovable birthday message for his wife actress genelia dsouza