13 December 2018

News Flash

विवेकने पोस्ट केलेल्या ‘त्या’ फोटोची रितेशने घेतली फिरकी

हे दोघंही पुन्हा प्रकाशझोतात आले आहेत

विवेक ऑबेरॉय, रितेश देशमुख

‘मस्ती’ या चित्रपटामुळे ज्या रितेश देशमुख आणि विवेक ऑबेरॉय यांच्या मैत्रीच्या चर्चा कलाविश्वात रंगण्यास सुरुवात झाली होती, ते दोन्ही अभिनेते पुन्हा एकदा प्रकाशझोतात आले आहेत. विवेक आणि रितेशच्या मैत्रीचे किस्से सांगावे तितके कमीच आहेत. पण, आता तर सोशल मीडियावरही त्यांच्या नात्याची एक सुरेख बाजू पाहायला मिळाली आहे. यामध्ये रितेशचा खोडकर अंदाजही लगेचच लक्षात येतोय.

विवेक ऑबेरॉयने ट्विटर अकाऊंटवरुन एक व्हायरल फोटो पोस्ट केला. या फोटोमध्ये एक व्यक्ती त्याच्या कुटुंबासमवेत समुद्रकिनारी आल्याचे पाहायला मिळत असून, त्या व्यक्तीने हातात महिलेच्या चपला पकडल्या असून, त्याच्या गळ्यात महिलांच्या बॅग्जही दिसत आहेत. हा फोटो पोस्ट करत विवेकने त्यासोबत लिहिले, ‘विवाहित पुरुष कुटुंबासोबत सुट्टीवर जातो तेव्हा हे असं असतं…’ विवेकने पोस्ट केलेला हा फोटो पाहून रितेशने त्याचीच फिरकी घेतली.

पाकिस्तानी ‘चाची’ची प्रेमकहाणी सोशल मीडियावर व्हायरल

‘तू या फोटोत खूपच सुंदर दिसतो आहेस, सुट्ट्यांचा आनंद घे मित्रा’, असं ट्विट करत रितेशने विवेकची खिल्ली उडवली. त्याच्या या ट्विटनंतर विवेकनेही ‘दोस्त हो तो ऐसा… आभारी आहे भाऊ’, असं लिहित रितेशला त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मिळालेल्या महागड्या ‘टेस्ला’ कारविषयी गमतीशीर विधान केलं. विवेक आणि रितेशमध्ये झालेला हा गमतीशीर संवाद सोशल मीडियावरही बराच गाजला.

First Published on January 12, 2018 2:13 pm

Web Title: bollywood actor riteish deshmukh trolls good friend actor friend vivek oberoi on social media who tweets a whatsapp forward