News Flash

आपल्या मुलांनी हे आयुष्य जगावं असं कोणालाच वाटणार नाही- सैफ अली खान

या क्षेत्रात कशाचीच शाश्वती नसते

सारा अली खान, सैफ अली खान

बॉलिवूडचा नवाब सैफ अली खान आणि त्याची पहिली पत्नी अमृता सिंग यांची मुलगी सारा अली खान सध्या तिच्या बॉलिवूड पदार्पणासाठी सज्ज होत आहे. ‘काय पो छे’, ‘शुद्ध देसी रोमान्स’ आणि ‘एम. एस. धोनी…’ फेम अभिनेता सुशांत सिंग राजपूतसोबत सारा स्क्रीन शेअर करणार आहे. पण, करिअर म्हणून चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्याच्या तिच्या या निर्णयावर पापा सैफ अली खानने मात्र नाराजी व्यक्त केली आहे. एकीकडे अमृता सिंग साराला तिच्या चित्रपट पदार्पणात पूर्ण पाठिंबा देत असली तरीही सैफचा तिला पाठिंबा नाही.

करिअर म्हणून चित्रपटसृष्टीची निवड करण्याऐवजी तिने स्थिरस्थावर पर्यायाची निवड करावी अशी त्याची अपेक्षा होती. याविषयीच ‘डीएनए’ला दिलेल्या मुलाखतीत सैफ म्हणाला, ‘तिला हा पर्याय का हवा आहे काय ठाऊक. न्यूयॉर्कमध्येच राहून त्या ठिकणीच काम करण्याला तिने प्राधान्य का दिलं नाहीये ते कळत नाही? अभिनय क्षेत्राकडे पाहण्याच्या माझ्या दृष्टीकोनाचा अजिबात गैरसमज करुन घेऊ नका. पण, करिअरमध्ये स्थैर्य असणं कधीही महत्त्वाचं असतं. इथे तर प्रत्येकजण एक प्रकारच्या चिंतेत असतो. किंबहुना कधीकधी तुम्ही सर्वोत्तम कामगिरी करुनही यशस्वी व्हाल याची काहीच शाश्वती नसते. त्यामुळे हे असं आयुष्य आपल्या मुलांनी जगावं असं कोणत्याच पालकांना वाटणार नाही.’

वाचा : जाणून घ्या अनुराग कश्यपच्या २३ वर्षीय गर्लफ्रेंडविषयी…

साराच्या करिअर निवडीबद्दल आपल्याला पूर्वकल्पना असल्याचंही त्याने या मुलाखतीदम्यान स्पष्ट करत त्याविषयीची एक आठवणही शेअर केली. ‘मला आठवतंय काही वर्षांपूर्वी एका कार्यक्रमासाठी आम्ही परदेशी गेलो होतो. मी सलमानसोबत व्यासपीठावर होतो. सारा विंगेत उभी राहून आम्हाला पाहात होती. त्यावेळी तिलाही याच क्षेत्रात पदार्पण करण्याची इच्छा आहे हे मी ओळखलं होतं’, असं सैफ म्हणाला. एक वडील म्हणून सारा आणि सैफचं नातं सर्वांनाच ठाऊक आहे. यावेळी सैफला साराच्या पहिल्या बॉलिवूड प्रोजेक्टविषयी विचारलं असता त्यात आपला काहीही सहभाग नसल्याचं त्याच्या बोलण्यातून स्पष्ट झालं. यावषियी सांगताना तो म्हणाला. ‘तिला कधीही गरज लागली तर मी तिच्या मदतीसाठी आहेच. ती सध्या काय करतेय हे मला ठाऊक आहे. इतर सर्व गोष्टींप्रमाणेच चित्रपटांच्या विषयावरही आम्ही बरीच चर्चा करतो’, असं सैफ म्हणाला.

saifalikhan-daughtersara759

sara-sushant-759

workout-sara-ali-khan_820

वाचा : Father’s Day 2017: मी सईला पहाटे ३ वाजताही उठवतो- सागर कारंडे

सध्या सैफची ही मुलगी बऱ्याच कारणांनी चर्चेत आली आहे. खासगी आयुष्यासोबतच तिच्या पहिल्यावहिल्या चित्रपटाबद्दलही प्रेक्षकांमध्ये बरीच उत्सुकता पाहायला मिळत आहे. त्यामुळे बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वीच साराने सर्वांचे लक्ष वेधण्यात यश मिळवलंय असं म्हणायला हरकत नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 16, 2017 3:52 pm

Web Title: bollywood actor saif ali khan is not happy with her career choice of daughter sara ali khan
Next Stories
1 कतरिनाचा अॅक्शन अवतार
2 ‘दंगल’ला टक्कर देण्यास ‘बाहुबली’ सज्ज
3 हृतिक रोशनचीच मुलं असं काही करू शकतात
Just Now!
X