News Flash

Tubelight : ..’या’ आजारामुळे सलमानला मिळाली प्रेरणा

....त्यानंतर मी आपल्या कामाविषयी गांभिर्याने विचार करु लागलो.

सलमान खान, कबीर खान

अभिनेता सलमान खान त्याच्या चाहत्यांसोबत नेहमीच दिलखुलास संवाद साधतो. विविध कार्यक्रमांपासून ते अगदी त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटपर्यंत सर्व ठिकाणी हा ‘दबंग’ खान त्याच्या जीवनातील बऱ्याच घडामोडींबद्दल सर्वांनाच माहिती देत असतो, असं म्हणायला हरकत नाही. त्याच्या आगामी ‘ट्युबलाइट’ या चित्रपटातील पहिलं गाणं नुकतंच प्रदर्शित करण्यात आलं. दुबईमध्ये चाहत्यांच्या तुडूंब गर्दीत सलमानने यावेळी बऱ्याच गोष्टींवर चर्चा केली. यावेळी त्याने एका आजाराशी झुंजतानाची त्याची आठवणही सांगितली. ‘ट्रायजेम्युनल न्युराल्जिया’ नावाच्या आजाराशी झुंजतानाच त्याला आपल्या कामाविषयी गांभीर्याची जाणिव झाली.

सध्याच्या घडीला सलमान ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यस्त असून, अबूधाबीमध्ये या चित्रपटाचं चित्रीकरण सुरु आहे. या चित्रपटाआधी तो ‘ट्युबलाइट’मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सलमान खानच्या याच आगामी चित्रपटाचं गाणं सध्या ट्रेंडमध्ये आलंय. या गाण्यात माऊथॉर्गनचा ताल आणि त्या तालावर नाचणारा सलमान खान म्हणजे क्या बात! विचार करण्यासाठी जास्त डोकं लावण्याची गरज नाही. कारण सलमानच्या ‘ट्युबलाइट’ या चित्रपटाच्या पहिल्या गाण्यामध्ये ही धमाल पाहायला मिळते आहे.

‘सजन रेडिओ बजैय्यो जरा…’ असे बोल असणारं ‘रेडिओ साँग’ पाहता ‘ट्युबलाइट’बद्दलची उत्सुकता आणखीनच शिगेला पोहोचली आहे. सलमा खान आणि सलमान खान यांची निर्मिती असणारा हा चित्रपट ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार असल्याचं म्हटलं जात आहे. कबीर खान दिग्दर्शित ट्युबलाइट या चित्रपटामध्ये १९६० च्या दरम्यानचा काळ साकारण्यात आला असून, त्यामध्ये भारत-चीन युद्धाच्या पार्श्वभूमीचेही चित्रण करण्यात आलं आहे. सलमान आणि कबीर खान या चित्रपटाच्या निमित्ताने तिसऱ्यांदा एकत्र काम करत आहेत. त्यामुळे या चित्रपटाकडून प्रेक्षकांनाही बऱ्याच अपेक्षा आहेत, असं म्हणावं लागेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 17, 2017 12:16 pm

Web Title: bollywood actor salman khan at tubelight radio song launch kabir khan
Next Stories
1 PHOTO अभिनेत्यांचा आलिशान आशियाना!
2 Cannes Film Festival 2017: ..असा असेल यंदाचा ‘कान फिल्म फेस्टिव्हल’
3 ‘त्या’ व्यापाऱ्याविरोधात शिल्पा-राजने ठोकला १०० कोटींचा अब्रूनुकसानीचा दावा
Just Now!
X