News Flash

भावनिक, नैराश्यग्रस्त होणं मला परवडणारं नाही- सलमान खान

परिस्थितीचा सामना करण्याचा एक वेगळा दृष्टीकोन सलमानने दिला.

सलमान खान

नैराश्य आणि तणाव या गोष्टींचा सामना केल्याची कबुली आजवर बऱ्याच सेलिब्रिटींनी दिली आहे. ज्यामध्ये अभिनेत्री दीपिका पदुकोणपासून ते ग्रीक गॉड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेता ऋतिक रोशनपर्यंत सर्वांनीच आपल्या आयुष्यातील या वळणाविषयी उघडपणाने चर्चा केली आहे. पण, अभिनेता सलमान खानचं मात्र याविषयीचं थोडं वेगळं मत आहे. ‘भावनिक किंवा नैराश्यग्रस्त होणं मला परवडण्यातलं नाही,’ असं सलमानने स्पष्ट केलं आहे.

‘इंडियन एक्स्प्रेस’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार सलमानने काही महत्त्वाच्या गोष्टी स्पष्ट केल्या. चित्रपटांमध्ये व्यग्र नसल्यावर किंवा काही गोष्टी योग्य सुरु नसल्याचं लक्षात आलं तरीही तू स्वत:ला कशा प्रकारे गुंतवून ठेवतोस?, असा प्रश्न विचारला असता सलमान म्हणाला, ‘मी अशा बऱ्याच लोकांना पाहिलं आहे, जे सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी बाहेर जातात. पण, हे मला परवडणारं नाही. किंबहुना अशाही बऱ्याच व्यक्ती मी पाहिल्या आहेत, जे भावनेच्याभरात वाहत जाऊन नैराश्यग्रस्त होतात. पण ही गोष्टीसुद्धा मला परवडणारी नाही. मी दु:खी किंवा भावनिक झालो किंवा मग इतर कोणत्याही परिस्थितीचा सामना करत असेन तर या गोष्टी माझ्या विरोधातच जातात.’

VIDEO: धोनीचा संयम सुटला, मनिष पांडेबद्दल अपशब्द वापरला

वाचा : VIDEO : तरुणाईला वेड लावणाऱ्या प्रियाचं ‘ते’ भुवई उंचावणं चोरीचं?

परिस्थिती कधीही आपल्याला साथ देत नाही हेच सलमानने स्पष्ट केलं. आयुष्याला कधीही सबटायटल्स नसतात असं म्हणत, येईल त्या परिस्थितीचा सामना करण्याचा एक वेगळा दृष्टीकोन सलमानने दिला. सध्याच्या घडीला बी- टाऊनचा हा दबंग अभिनेता ‘रेस ३’ या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र असल्याचे कळत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 23, 2018 4:23 pm

Web Title: bollywood actor salman khan cant afford luxury of being depressed or emotional
Next Stories
1 PHOTO : ‘त्यांच्या’ हसण्यावर खिलाडी कुमार भाळला
2 रणबीरची शेवटची आठवणही दीपिकाने मिटवली?
3 ….म्हणून ‘पॅडमॅन’मधील माझ्या भूमिकेवर कात्री लावली- सोनम कपूर
Just Now!
X