‘दबंग खान’ या नावाने ओळखला जाणारा अभिनेता सलमान खान सध्या ‘दस का दम’ या रिअॅलिटी शोमध्ये आणि ‘भारत’ या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यग्र आहे. माल्टामध्ये सलमानच्या ‘भारत’ या चित्रपटाचं चित्रीकरण सुरु असून, त्याला या चित्रपटाच्या सेटवर एका खास व्यक्तीची साथ मिळाली आहे. ती व्यक्ती म्हणजे सलमानची आई.

सलमान आपल्या व्यग्र वेळापत्रकातून कुटुंबाला नेहमीच प्राधान्य देतो. यातच सलमान त्याच्या आईला नेहमीच महत्त्वं देत असून, तिच्यासोबतही काही खास क्षण व्यतीत करतो. सध्याही सोशल मीडियावर त्याने पोस्ट केलेला व्हिडिओ पाहून याचीच प्रचिती आली आहे. ‘भारत’ या चित्रपटासाठी माल्टामध्ये असणाऱ्या सलमानने त्याच्या आईसोबतचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये तो पायऱ्या चढतेवेळी आईला आधार देताना दिसत आहे. ‘ये बंधन तो…’ या गाण्याची ओळ सलमानने कॅप्शनमध्ये लिहिली असून, व्हिडिओमध्ये ते गाणं वाजत आहे. त्यामुळे खरंच हे जन्मोजन्मीचं बंधन सर्वांचच मन जिंकत आहे, असं म्हणणं वावगं ठरणार नाही.

वाचा : काम करणार तर आघाडीच्या अभिनेत्रीसोबतच, रणबीरचा हट्ट

सोशल मीडियावर हा व्हिडिओ पोस्ट करताच काहींनी तो रिपोस्टही केला. तर, हजारोंच्या संख्येने नेटकऱ्यांनी हा व्हिडिओ पाहत त्याला लाइक केलं आहे. याआधीही सलमानने सोशल मीडियावर आईसोबतचा एक व्हिडिओ शेअर केला होता. ज्यामध्ये तो माल्टामध्ये आईसोबत फिरत असल्याचं पाहायला मिळालं होतं. विविध चित्रपट आणि एकंदरच व्यग्र वेळापत्रक या साऱ्यामध्ये तो कधीच आपल्या कुटुंबाकडे दुर्लक्ष करत नाही, हेच पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे.