22 November 2017

News Flash

सलमानसोबतचा तिचा सेल्फी होतोय व्हायरल

आयफा सोहळ्यादरम्यानचा तो क्षण...

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: July 17, 2017 2:40 PM

छाया सौजन्य- ट्विटर

चाहत्यांमुळेच एक सर्वसामान्य कलाकार सेलिब्रिटी होतो ही बाब नाकारता येणार नाही. चाहत्यांचं नि:स्वार्थ प्रेम आणि त्यांचा पाठिंबा या दोन मुख्य घटकांच्या बळावर आजवर बऱ्याच कलाकारांनी यशाची शिखरं गाठली आहेत. असाच एक सेलिब्रिटी म्हणजे अभिनेता सलमान खान. भाईजान सलमानच्या चाहत्या वर्गात नेहमीच वाढ झाल्याचं पाहायला मिळालंय. फक्त भारतातच नाही, तर परदेशातही त्याचे चाहते पाहायला मिळतात. तो जेव्हा कधी काही कामानिमित्त परदेशात जातो तेव्हा या सुपरस्टारची एक झलक टिपण्यासाठी बरेचजण अनोख्या शकला लढवतात. सध्या सुरु असणाऱ्या आयफाच्या धामधुमीतही दबंग खानला अशीच एक चाहती भेटली.

मुख्य म्हणजे सलमानसोबतचा तिचा सेल्फी सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. अनघा फाल्गुने नावाच्या या चाहतीने काढलेला हा सेल्फी जरा हटके आहे. कारण, सलमान कारमधून जात असतानाच अनघाने हा सेल्फी इतक्या पटकन क्लिक केला की, तिने फोटो काढण्याची आणि सलमानने कॅमेऱ्याकडे बघण्याची वेळ अगदी सुरेख जमून आली. हा खास क्षण अनघाने तिच्या ट्विटर अकाऊंटवरही शेअर केला. अनघाची ही फॅन मुमेंट सध्या बरीच गाजतेय.

tweet-salman

वाचा : गोष्ट पहिल्या सुपरस्टारच्या पहिल्या प्रेयसीची…

आयफा पुरस्कार सोहळ्यादरम्यान, न्यूयॉर्कमधील आणखी एका चाहत्याचं नाव प्रकाशझोतात आलं होतं. रौनक शाह नावाच्या या चाहत्याने इन्स्टाग्राम अकाऊंटवर बऱ्याच बॉलिवूड सेलिब्रिटींसोबतचे त्याचे फोटो पोस्ट केले आहेत. त्यामुळे चाहत्यांचं हे असं प्रेम एका अर्थी त्या सेलिब्रिटीलासुद्धा प्रकाशझोतात आणण्यास कारणीभूत ठरत आहे असं म्हणायला हरकत नाही.

First Published on July 17, 2017 2:36 pm

Web Title: bollywood actor salman khan fan clicked epic selfie during iifa 2017 went viral on internet see photo twitter