17 February 2019

News Flash

अर्पिताच्या घरी गणेशोत्सवाची धूम, सलमानसह कतरिना आणि लूलियाची हजेरी

मलायका अरोरानेही अर्पिताच्या घरी येत बाप्पाचरणी आपली श्रद्धासुमनं अर्पण केली.

छाया सौजन्य- इन्स्टाग्राम

गणेश चतुर्थीचा उत्साह सर्वत्रच पाहायला मिळत असताना संपूर्ण कलाविश्वही यापासून दूर नाही. दरवर्षीप्रमाणे यंदाही अभिनेता संजय दत्तपासून ते श्रद्धा कपूरपर्यंत प्रत्येकाच्या घरी बाप्पा विराजमान झाले असून, त्यांच्या दर्शनासाठी इतर सेलिब्रिटींनी हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. सेलिब्रिटींचा गणेशोत्सव म्हटलं की चर्चा होते ती म्हणजे अभिनेता सलमान खानच्या घरच्या बाप्पाची.

यंदाच्या वर्षी सलमानच्या घरी साजरा होणाऱ्या गणेशोत्सवाची धूम पाहायला मिळाली त्याची बहीण अर्पिता खान शर्मा हिच्या घरी. संपूर्ण खान कुटुंब अर्पिताच्या घरी यावेळी आल्याचं पाहायला मिळालं. अर्पितावर जिवापाड प्रेम करणारा तिचा भाऊ, अभिनेतासलमान खानही यावेळी उपस्थित होता. त्यासोबतच त्याची तथाकथिच प्रेयसी लूलिया वंतूरही अर्पिताच्या घरी बाप्पांच्या दर्शनासाठी पोहोचली होती.

वाचा : बाप्पा मोरया : आम्ही चालवू हा पुढे वारसा…..

अभिनेत्री कतरिना कैफही तिची बहीण इसाबेल हिच्यासोबत या आनंदात सहभागी झाली होती. सोशल मीडियावर या सेलिब्रिटींचे बरेच फोटोही पाहायला मिळाले. मलायका अरोरानेही अर्पिताच्या घरी येत बाप्पाचरणी आपली श्रद्धासुमनं अर्पण केली. तर, अरबाज खानने त्याची बहुचर्चित आणि तथाकथित प्रेयसी जॉर्जिया हिच्यासोबत हजेरी लावत सर्वांचं लक्ष वेधलं.

First Published on September 14, 2018 12:57 pm

Web Title: bollywood actor salman khan iulia vantur and katrina kaif celebrate ganesh chaturthi at arpita khans home photo