25 October 2020

News Flash

Race 3 Review : ‘रेस ३’ चित्रपट नव्हे, तर फालुदा…

बिग बजेट चित्रपट, तगडी स्टारकास्ट या साऱ्या गोष्टींची घडी नीट बसली खरी पण, कथानकाच्या बाबतीत मात्र 'रेस ३' मागे पडलाय

Race 3 review, सलमानच्या 'रेस ३' विषयीची मतं...

Race 3 Review. दरवर्षीप्रमाणे यंदाच्या ईदच्या मुहूर्तावरही सलमान खान चाहत्यांना ईदी देण्यासाठी आला तो म्हणजे त्याच्या चित्रपटासोबत. भाईजान सलमान खान ‘रेस ३’ या चित्रपटाच्या निमित्ताने प्रेक्षकांच्या भेटीला आला. मुख्य म्हणजे अनिल कपूर, बॉबी देओल, डेझी शाह या कलाकारांच्या फौजफाट्यासह सलमानने रुपेरी पडद्यावर ग्रँड एन्ट्री घेतली. पण, त्याचा हा अंदाज चाहत्यांना काही भावला नाही.

बिग बजेट चित्रपट, तगडी स्टारकास्ट या साऱ्या गोष्टींची घडी नीट बसली. पण, कथानकाच्या बाबतीत मात्र ‘रेस ३’ मागे पडलाय त्यातही चित्रपटातील संवादांविषयी वेगळं काही सांगण्याी गरजच नाही. सलमानच्या या चित्रपटाबद्दल प्रत्येकजण आपल्या प्रतिक्रिया देत असताना आता चर्चा होतेय ती म्हणजे एका अशा काकूंच्या रिव्ह्यूची जो पाहून खरंच आपण हा चित्रपट पाहावा का, असा विचार चाहत्यांच्या मनात घर करु लागतोय.

चित्रपटाच्या संवादांपासून ते त्यामध्ये झळणाऱ्या अभिनेत्रीपर्यंत प्रत्येक गोष्टीवर या व्हिडिओतून रिव्ह्यू देण्या आला असून, हा फिल्मी फालूदा आपल्याला मुळीच आवडला नसल्याचं स्पष्ट मत त्यांनी मांडलं आहे. सलमानची शरीरयष्टी म्हणू नका किंवा मग बॉबी देओलचा अभिनय कोणत्याच बाबीत ‘रेस ३’ला चाहत्यांवर पकड बनवता आलेली नाही, ये या रिव्ह्यूमध्ये पाहायला मिळत आहे.

वाचा : रणबीर- आलियाच्या प्रेमप्रकरणामुळे दुखावली कतरिना?

दरम्यान सोशल मीडियावरही या चित्रपटाविषयीचे बरेच मीम्स व्हायरल झाले आहेत. चमचमते कपडे, महागड्या गाड्या, भरभरून अॅक्शन सीन्स, बिलीयन डॉलर्सच्या डील्स… पण कथेच्या बाबतीत मात्र ‘रेस ३’ फ्लॉप ठरला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 16, 2018 9:11 am

Web Title: bollywood actor salman khan starrer movie race 3 aunty review watch video
Next Stories
1 Happy Birthday Mithun Chakroborty : असा ‘डिस्को डान्सर’ होणे नाही
2 Gold Movie Teaser : अन् त्यांच्या प्रयत्नाने ब्रिटीशही भारतीय राष्ट्रगीताच्या सन्मानार्थ उभे राहू लागले
3 ‘थोडा रहम कर लो’, ‘रेस ३’ पाहिल्यावर सोशल मीडियावर हास्यकल्लोळ
Just Now!
X