18 February 2019

News Flash

धरमपाजींसोबत थिरकणार दबंग खान

धर्मेंद्र आणि सलमान यांच्यात खूप चांगली मैत्री आहे

सलमान खान, धर्मेंद्र

कलाविश्वात ‘यारों का यार’ म्हणून ओळखला जाणारा अभिनेता सलमान खान पुन्हा एकदा आपल्या मैत्रीचा आदर्श देण्यासाठी सज्ज झाला आहे. आपल्या कलाकार मित्राचा चित्रपटात काम करण्यासाठी सलमानने पुन्हा तयारी दाखवली असून येत्या काळात तो ज्येष्ठ अभिनता धर्मेंद्र यांच्या ‘यमला पगला दिवाना ३’ या चित्रपटात झळकणार आहे. ‘अजब प्रेम की गजब कहानी’, ‘ओम शांती ओम’, ‘दीवाना मस्ताना’ आणि ‘तीस मार खान’ यांसारख्या चित्रपटांमध्ये पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसलेला सलमान ‘यमला पगला दिवाना ३’ मध्ये नेमका कोणत्या भूमिकेत दिसणार यावरुन मात्र पडदा उचलण्यात आला नाहीये.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार धर्मेंद्र आणि सलमान यांच्यात खूप चांगले नातेसंबंध आहेत. त्यामुळे ज्यावेळी या आगामी चित्रपटात त्यांनी सलमानची निवड करण्याची कल्पना पुढे केली तेव्हा त्याने लगेचच त्यासाठी होकार दिला. या चित्रपटातील एका गाण्यात तो झळकणार असून धरमपाजींसोबत तो या गाण्यात थिरणारही आहे.

वाचा : पुरुष कलाकारांनी कमी मानधन आकारावं- दीपिका पदुकोण

सनी आणि बॉबी देओलच्या बॉलिवूड करिअरमध्येही सलमानने बरीच हातभार लावला आहे. ‘रेस ३’मध्येसुद्धा बॉबीची वर्णी लावण्यामागे सलमानचं योगदान असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे सलमान खऱ्या अर्थाने अनेकांचाच हितचिंतक आहे असं म्हणायला हरकत नाही. देओल कुटुंबियांच्या अफलातून अशा ‘यमला पगला दिवाना’मध्ये भाईजान सलमान झळकला तर चाहत्यांसाठी ही एक पर्वणीच ठरणार आहे. ‘यमला पगला दीवाना’ या चित्रपटाच्या पहिल्या भागाला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला होता. त्यानंतर आलेल्या ‘यमला पगला दीवाना २’ या चित्रपटाला प्रेक्षकांनी तुलनेने कमी प्रतिसाद दिला. त्यामुळे येत्या काळात या चित्रपटाच्या तिसऱ्या भागाला यश मिळवून देण्यात सलमानच्या उपस्थितीचा काही फायदा होतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

First Published on February 14, 2018 5:08 pm

Web Title: bollywood actor salman khan to shake a leg with dharmendra in yamla pagla deewana 3