21 September 2020

News Flash

संजय दत्तच्या मुलीची ‘ही’ ओळख तुम्हाला माहितीये का?

ती सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय आहे.

त्रिशाला दत्त

गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडमध्ये सेलिब्रिटी किड्सच्याच नावाची चर्चा सुरु आहे. शाहरुख खानपासून ते चंकी पांडेपर्यंत जवळपास सर्वच सेलिब्रिटी किड्स सध्या अनेकांचं लक्ष वेधत आहेत. पण, या सर्वांमध्ये अशी एक सेलिब्रिटी किड आहे, जी थोडी हटके आहे. तिच्या या हटके अंदाजामुळे सध्या अनेकांनाच आश्चर्याचा धक्का बसत आहे. संजूबाबाची मुलगी अशी अचानक प्रकाशझोतात येण्याचं कारण म्हणजे तिने नुकताच पोस्ट केलेला एक फोटो.

त्रिशालाने नुकतंच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक फोटो पोस्ट करत त्याला साजेसं कॅप्शनही दिलं आहे. ‘डॅडीज गर्ल’ असं म्हणत तिने हा फोटो पोस्ट केलाय. यामध्ये संजय दत्तने चिमुरड्या त्रिशालाला उचलून घेतल्याचं पाहायला मिळतंय. त्रिशालाचा चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्याचा काहीच मनसुबा नसला तरीही तिच्या सोशल मीडिया पोस्ट याबद्दलचे तर्क लावण्यास अनेकांनाच भाग पाडत आहेत.

वाचा : अक्षयसोबत प्रियांकाचं नाव जोडताच ट्विंकलचा राग अनावर

त्रिशालाने स्वत:चा मेकओव्हरही करुन घेतला असून, ती सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय आहे. मुख्य म्हणजे आपल्या मुलीने हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करु नये असं खुद्द संजय दत्तनेच एका मुलाखतीत म्हटलं होतं. ‘तिला योग्य त्या क्षेत्रात करिअरची संधी देण्यासाठी मी बराच पैसा आणि वेळ खर्चला आहे’, असं संजूबाबाने स्पष्ट केलं होतं. सध्या ती आपल्या करिअरवर जास्त लक्ष केंद्रित करत ‘एफबीआय’सोबतंही काम केलं आहे. त्याशिवाय तिने फॅशन डिझायनिंगचंही शिक्षण घेतलंय. सध्याच्या घडीला ती न्यूयॉर्कमध्ये मानसशास्त्राचंही शिक्षण घेतेय. त्यामुळे त्रिशाला इतर बी- टाऊन सेलिब्रिटी किड्सपेक्षा फारच वेगळी ठरतेय असंच म्हणावं लागेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 29, 2017 7:53 pm

Web Title: bollywood actor sanjay dutt daughter trishala dutt know more about her
Next Stories
1 VIDEO : ‘तेरे बिना’ गाण्यात श्रद्धा आणि अंकुरचा रोमॅण्टिक अंदाज
2 गुगलचे सीईओ सुंदर पिचाई आणि किंग खानमध्ये रंगणार चर्चा
3 देवा, पावसाच्या तडाख्यापासून मुंबईला वाचव; कलाकारांचं गणरायाला साकडं
Just Now!
X