25 November 2020

News Flash

PHOTOS : बहिणीच्या लग्नात दिसला शाहरुखच्या मुलीचा मोहक अंदाज

सुहानाचे सौंदर्य आणखीनच खुलून आले होते.

सुहाना खान

शाहरुख खानच्या मुलीवर म्हणजेच सुहाना खानवर पुन्हा एकदा सर्वांच्याच नजरा खिळल्या असून, ‘परी म्हणू की सुंदरा…’ याच ओळी अनेकांच्या मनात घर करत असल्याचे पाहायला मिळाले. सुहाना सध्या दिल्लीमध्ये असून बहिणीच्या लग्नसोहळ्यात ती मोठ्या उत्साहात सहभागी झाली आहे. याच लग्नसोहळ्यातील सुहानाचा एक मोहक फोटो सध्या अनेकांचे लक्ष वेधतोय.

सेलिब्रिटींच्या घरातील कोणताही समारंभ म्हटलं की त्यासाठी सेलिब्रिटी फॅशन डिझायनरची वर्णी लागते यात वादच नाही. असेच काहीसे यावेळीसुद्धा पाहायला मिळाले. बहिणीच्या लग्नासाठी सुहानाने मोनिषा जयसिंग या सेलिब्रिटी फॅशन डिझायनरने डिझाईन केलेला लेहंगा घातला होता. फिक्कट हिरव्या रंगाच्या या लेहंग्यावर रेशीम धागे आणि कुंदन यांपासून कलाकुसर करण्यात आली असून, ती लेहंग्याला आणखीनच उठावदार बनवून गेली होती.

मोनिषाच्या या लेहंग्यामध्ये सुहानाचे सौंदर्य खुलून आले होते. शिवाय तिने ज्या अनोख्या अंदाजात हा लूक कॅरी केला होता, ते पाहता पुन्हा एकदा तिच्या अदांनी अनेकांना घायाळ केले असेच म्हणावे लागेल. सध्याच्या घडीला बॉलिवूडमध्ये चर्चेत असणाऱ्या स्टारकिड्सच्या यादीत शाहरुखच्या मुलीच्या नावाचाही समावेश आहे. इतकेच नव्हे तर ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याच्या तयारीत असल्याचीही चिन्हं आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 31, 2017 1:07 pm

Web Title: bollywood actor shah rukh khan daughter suhana khan looks stunning at a cousins wedding see photo
Next Stories
1 Rajinikanth political entry : ‘फॅन क्लब’च्या माध्यमातून रजनीकांत उभारणार कार्यकर्त्यांची फौज
2 जस्टिस लीग ‘२०१७ फ्लॉप ऑफ द ईयर’
3 पोलिसांना मारहाणी प्रकरणी लुना लेसेप्सला अटक
Just Now!
X