News Flash

शाहरूख का झाला कट्टरतावाद्यांकडून ट्रोल ?

अनेकांनी शाहरूखला पाठिंबा देत आपला संताप व्यक्त केला आहे.

सध्या संपूर्ण देश दिवाळीच्या रंगात रंगून गेला आहे. यातच बॉलिवूडचे कलाकारही मागे नाहीत. बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच शाहरूख खाननं अनोख्या पद्धतीनं देशवासीयांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या. आपल्या कपाळावर टीळा लावलेला एक फोटो त्यानं आपल्या इंस्टाग्रामवर शेअर करत त्यानं देशवासीयांना शुभेच्छा दिल्या होत्या. या फोटोमध्ये त्याची पत्नी गौरी खान आणि त्याचा मुलगा अबरामदेखील त्याच्या सोबत दिसत आहे. तिघांचा फोटो शेअर करत त्यानं सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

इंस्टाग्रामवर शाहरूखनं हा फोटो शेअर करताच काही कट्टरतावादी ट्रोलर्सनं त्याला ट्रोल करण्यास सुरूवात केली. तर काही युझर्स त्याच्या समर्थनार्थ बोलत होते. त्यातच ज्येष्ठ कलाकार शबाना आझमीदेखील शाहरूखच्या बाजूने बोलताना दिसल्या. काही कट्टरतावादी शाहरूखने दिलेल्या दिवाळीच्या शुभेच्छांवरूनही आपला राग व्यक्त करत आहेत, हे पाहून मला आश्चर्य वाटत असल्याच्या त्या म्हणाल्या. त्यांनी ट्विट करून आपला संताप व्यक्त केला.

 

View this post on Instagram

 

#HappyDiwali  to everyone. May your lives be lit up and happy.

A post shared by Shah Rukh Khan (@iamsrk) on

काही कट्टरतावाद्यांनी त्याचा फोटो पाहून हा खोटा मुसमान असल्याचं म्हटलं. तर काही जणांनी शाहरूखच्या बाजूने बोलत इस्लाम एवढाही कमकुवत नाही की त्याला अशा सुंदर भारतीय परंपरेमुळे धोका निर्माण होईल. शबाना आझमी यांनी कट्टरतावाद्यांचा समाचार घेतल्याचं दिसून आलं. त्यांचं ट्विट मोठ्या प्रमाणात व्हायरल झालं. दरम्यान, या संपूर्ण प्रकारावर शाहरूखनं मात्र अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 29, 2019 12:43 pm

Web Title: bollywood actor shah rukh khan got trolled over photo shared on instagram shabana azmi in support tweet jud 87
Next Stories
1 सलमानने सहा दिवस आधी ठरलेलं लग्न मोडलं, साजिद नाडियाडवालाने केला खुलासा
2 राज कुंद्रा अडचणीत, इक्बाल मिर्ची कनेक्शन प्रकरणी ईडीकडून समन्स
3 अशोक सराफ यांच्या ‘प्रियतम्मा’वर आली पेन्शनवर जगण्याची वेळ
Just Now!
X