News Flash

… या केंद्रीय मंत्र्याच्या मुलीसोबत शाहरुखचं नातं तरी काय?

एक फोटो रिपोस्ट करत किंग खानने केला याबद्दलचा खुलासा

छाया सौजन्य- इन्स्टाग्राम

कलाविश्व आणि राजकारण यांच्यामध्ये एक वेगळ्याच प्रकारचं नातं आहे. अनेकदा या नात्याची प्रचिती येतच असते. त्यातही कलाकारांना कधी कोणत्या नात्याची आठवण होईल याचा काहीच नेम नाही. बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंवर पोस्ट केलेला फोटो पाहून याचाच प्रत्यय येत आहे. शाहरुखने एक फोटो पोस्ट करत त्यामध्ये स्मृती इराणींचाही उल्लेख केला आहे. मुख्य म्हणजे त्याने पोस्ट केलेला हा फोटो स्मृती यांच्या मुलीचा आहे. हा फोटो पाहताना प्रथमदर्शनी किंग खानने नेमका तिचा फोटो का पोस्ट केला असावा आणि त्यांचं नातं तरी काय आहे असाच प्रश्न अनेकांच्या मनात घर करत आहे.

स्मृती इराणी यांचे पती जुबिन इराणी आणि शाहरुख खान हे बालपणापासूनचे मित्र आहेत. स्मृती इराणींनी काही दिवसांपूर्वीच इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेनेलचा फोटो पोस्ट केला होता. तोच फोटो किंग खानने रिपोस्ट करत त्याच्या कॅप्शनमध्ये आपणच शेनेलचं नाव ठेवलं होतं असं सांगितलं आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्याने शेनेलची प्रशंसाही केली आहे. त्यामुळे शाहरुख आणि शेनेलचं हे कनेक्शन खरंच अफलातून आहे असं म्हणायला हरकत नाही.

२००१ मध्ये स्मृती आणि जुबिन विवाहबंधनात अडकले होते. मुख्य म्हणजे जुबिन यांचं हे दुसरं लग्न. शेनेल ही जुबिनच्या पहिल्या पत्नीची म्हणजेच मोना इराणी यांची मुलगी आहे. पण, शेनेल आणि स्मृती इराणी यांच्या नात्यात मात्र इतकी सहजता आहे की, ती स्मृती यांचीच मुलगी आहे असं वाटतं. स्मृती आणि जुबिन यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. त्यांच्या मुलाचं नाव जौहर आहे तर, मुलीचं नाव जोइश आहे. स्मृती इराणी सध्या केंद्रीय मंत्रिमंडळात वस्त्रोद्योग मंत्रीपदाचं काम सांभाळत असून गेल्या बऱ्याच वर्षांपासून त्या टेलिव्हिजन विश्वापासून पूर्णपणे वेगळ्या झाल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 8, 2017 1:40 pm

Web Title: bollywood actor shah rukh khan reveals that he named smriti irani stepdaughter posts a photograph on instagram
Next Stories
1 शाहिदची पत्नी मीरा राजपूतने वाहतुकीचे नियम मोडले आणि…
2 …या आहेत बॉलिवूडमधील ‘सिंगल मदर्स’
3 ‘वेटर’ ते बाहुबलीतील ‘बिज्जलदेव’…. अभिनेता नसरचा प्रवास
Just Now!
X