अभिनेत्री कतरिना कैफ येत्या काळात ‘झिरो’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘जब तक है जान’नंतर शाहरुख खानसोबत ती या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. अशा या चित्रपटातील कतरिनाचा फर्स्ट लूक नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

शाहरुख खाननेच सोशल मीडियाच्या माध्यमातून कतरिनाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत ‘झिरो’मधील तिचा लूक सर्वांसमोर आणला आहे. हा लूक पाहता कधीही न पाहिलेली कतरिना प्रेक्षकांचं लक्ष वेधत आहे. आतापर्यंतच्या कारकिर्दीत झिरोमधील तिचा लूक सर्वाधिक लक्षवेधी आणि प्रभावी वाटत आहे. काळ्या रंगाच्या छटेचा या लूकमध्ये जास्त वापर दिसत आहे. हा फोटो पोस्ट करत शाहरुखने त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिलं, ‘तिचे आतापर्यंत बरेच फोटो वगैरे काढले आहेत. पण, मित्रांनो हा फोटो सर्वाधिक सुंदर आहे, तुम्हालाही तो आवडेल.’

वाचा : चाचा- चाचींना सलाम: १३ हजार फुटांवर जवळपास ४५ वर्षे चालवतायेत ढाबा

आनंद एल. राय दिग्दर्शित या चित्रपटात स्पेशल इफेक्ट्सच्या सहाय्याने शाहरुखला बुटक्या व्यक्तीच्या भूमिकेत दाखवण्यात आले आहे. यंदाच्या वर्षअखेरीस शाहरुखचा हा चित्रपट या वर्षअखेरीस प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये अभिनेत्री अनुष्का शर्माचीही मत्त्वाची भूमिका असणार आहे. ‘रांझना’, ‘तनू वेड्स मनू’ आणि ‘तनू वेड्स मनू रिटर्न्स’ यांसारख्या सुपरहिट चित्रपटांचे दिग्दर्शक आनंद एल. राय याचे दिग्दर्शन करणार असल्याने या चित्रपटाकडून प्रेक्षकांना बऱ्याच अपेक्षा आहेत.