12 December 2017

News Flash

शाहरुखपेक्षा आर्यनला ‘ही’ व्यक्ती जास्त प्रिय

त्याचा एक सुरेख फोटो सध्या अनेकांचच लक्ष वेधत आहे

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: June 19, 2017 8:42 PM

आर्यन खान

‘फादर्स डे’ जरी पार पडला असला तरीही त्याचा उत्साह आणि सेलिब्रिटींच्या खास पोस्ट्स सर्वांचेच लक्ष वेधत आहेत. अभिनेत्री दीपिका पदुकोण, आमिर खान आणि इतर कलाकारांनी ‘फादर्स डे’च्या निमित्ताने सोशल मीडियावर काही सुरेख फोटो पोस्ट केले. पण, या सर्व फोटोंमध्ये लक्ष वेधलं ते म्हणजे शाहरुखच्या मुलाने म्हणजेच आर्यन खानने पोस्ट केलेल्या एका फोटोने. तुम्हाला जर वाटत असेल की आर्यनने शाहरुख सोबतचा एखादा सुरेख फोटो पोस्ट केला असेल, तर तसं नाहीये.

किंग खानच्या या लाडक्या मुलाने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन आपल्या आईसोबतचा एक सुरेख फोटो पोस्ट करत सर्वांचच लक्ष वेधलं. त्याने या फोटोला दिलेलं कॅप्शन इतकं सुरेख होतं की, गौरीनेही त्याचा हा फोटो रिपोस्ट केला. सोबतच फोटोचं ‘द बर्थ गिवर’ म्हणजेच ‘जन्म देणारी’ हे कॅप्शनही आपल्याला फार आवडलं असल्याचं तिने या पोस्टमध्ये म्हटलं आहे. आर्यनच्या या हटके फादर्स डे सेलिब्रेशनची चर्चा बॉलिवूड वर्तुळातही झाल्याचं पाहायला मिळालं.

VIDEO : ‘मन्नत’बाहेर सलमान शाहरुखला आवाज देतो तेव्हा…

सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आलेला हा फोटो पाहता चाहत्यांनी आर्यनची तुलना ‘सुपरडॅडी’ शाहरुखसोबतही केली आहे. त्याची चेहरेपट्टी अगदी शाहरुखप्रमाणेच असल्याचं पाहताक्षणी लक्षात येत आहे. तसं पाहायला गेलं तर शाहरुख आणि आर्यन यांच्यामध्ये मित्रत्वाचं नातं आहे. पण, सरतेशेवटी आई- मुलाचं नातं वेगळंच असतं हेसुद्धा तितकच खरं. त्यामुळेच आर्यनने यंदाचा ‘फादर्स डे’ त्याच्या आईला समर्पित केला.

Love The Tag line .. The Birth giver

A post shared by Gauri Khan (@gaurikhan) on

आर्यनच्या या पोस्टमुळे शाहरुखलाही अभिमान वाटला असणार यात काही शंकाच नाही. याच आनंददायी वातावरणामध्ये किंग खानच्या पत्नीने आणखी एका नव्या प्रवासाला सुरुवात केली. तिने डिझाईन केलेल्या एका रेस्तराँचं नुकतच उद्घाटनही झालं. ‘अर्थ’ रेस्तराँमध्ये झालेल्या पार्टीला जॅकलीन फर्नांडिस, आलिया भट्ट, सिद्धार्थ मल्होत्रा, मलायका अरोरा खान, सुशांत सिंग राजपूत, क्रिती सनॉन आणि इतरही काही कलाकारांनी उपस्थिती लावली होती.

First Published on June 19, 2017 8:36 pm

Web Title: bollywood actor shah rukh khan son aryan khan poses with mom gauri khan on fathers day