News Flash

‘त्या’ ड्रेसच्या प्रेमात पडलीये सुहाना

सुहाना तिच्या लूकच्या बाबतीतही बरीच सजग असते.

सुहाना खान, शाहरुख खान

बॉलिवूड इंडस्ट्रीतील सेलिब्रिटी किडस् नेहमीच चर्चेचा विषय असतात. यापैकी सुहाना खान हे नाव सातत्याने प्रकाशझोतात असते.
अभिनेता शाहरुख खानची मुलगी सुहाना खान बऱ्याच दिवसांपासून विविध सेलिब्रिटी पार्ट्या आणि काही कार्यक्रमांना हजेरी लावतेय. सध्या चित्रपटसृष्टीत तिचा वावर पाहता बी- टाऊनमध्ये पदार्पण करण्यासाठी सुहानाने या सर्व हाचलाची सुरु केल्याचे म्हटले जातेय. नेहमीच विविध रुपांमध्ये दिसणारी सुहाना तिच्या कपड्यांच्या आणि लूकच्या बाबतीतही बरीच सजग असते. पण, सर्वसामान्यांप्रमाणेच सुहानाही तिच्या वॉर्डरोबमधील एका ड्रेसच्या प्रेमात पडली आहे, असे म्हणायला हरकत नाही.

काही दिवसांपूर्वी ज्या डिझायनर ड्रेसमध्ये ती दिसली होती, अगदी तशाच प्रकारच्या ड्रेसमध्ये पुन्हा एकदा ती सर्वांसमोर आल्याचे पाहायला मिळाले. ‘अर्थ रेस्तराँ’च्या उद्घाटन सोहळ्याच्या वेळी सुहाना ‘हर्व लेजर’चा टॅन्जेरीन बॉडी हगिंग ड्रेस घातला होता. त्यानंतर पुन्हा एकदा सुहाना हर्व लेजरच्या टॅन्जेरिन ड्रेसमध्ये दिसली.

पाहा : Throwback Thursday : कपूर कुटुंबियांचे अविस्मरणीय क्षण…

नेहमीच आपल्या अदांनी अनेकांना घायाळ करणारी किंग खानची ही लाडकी लेक सध्या करण जोहरच्या स्टुडिओमध्येही हजेरी लावतेय. त्यामुळे तिच्या बॉलिवूड पदार्पणासाठी करणही हातभार लावणार असल्याचे कळते. करण आणि शाहरुख यांची मैत्री पाहता येत्या काळात ‘केजो’ने शाहरुखच्या मुलीला लाँच केले तर आश्चर्यकित होण्याचे कारण नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 28, 2017 1:13 pm

Web Title: bollywood actor shah rukh khans daughter suhana khan is in love with herve leger dress
Next Stories
1 शिल्पा शिंदेनंतर दुसरी अंगुरी भाभीसुद्धा शो सोडणार?
2 चित्रपट न पाहताच राजकीय नेते विरोध कसा करू शकतात; ‘पद्मावती’वरून सुप्रीम कोर्टाने केंद्राला फटकारले
3 प्रिन्स हॅरी- मेगनला प्रियांका चोप्राने दिल्या शुभेच्छा
Just Now!
X