News Flash

फोन नंबर मागणाऱ्या चाहत्याला शाहरुख म्हणाला…

अशाच एका चाहत्याच्या प्रश्नाला किंग खानला सामोरे जावे लागले

shah rukh khan
शाहरुख खान

सेलिब्रिटींच्या खासगी आयुष्यात नेमक्या कोणत्या घडामोडी होत असतात, ते कोणत्या प्रकारचे आयुष्य जगतात याविषयी जाणून घेण्यासाठी चाहत्यांमध्ये नेहमीच उत्सुकतेचे वातावरण पाहायला मिळते. आपल्या आवडत्या सेलिब्रिटीशी एकदातरी संवाद साधण्याची संधी मिळावी अशीच अनेकांची अपेक्षा असते. मुख्य म्हणजे काहीजणांना ही संधी मिळतेही. अशाच एका चाहत्याच्या प्रश्नाला किंग खानला सामोरे जावे लागल्याचे पाहायला मिळाले.

सोशल मीडियाच्या माध्यमातून कलाकार आणि चाहत्यांमध्ये असणारी दरी कमी झाली असली तरीही, त्या माध्यमातून बऱ्याचदा चाहते सेलिब्रिटींना अवाजवी प्रश्न विचारतात. शाहरुखलाही अशाच एका चाहत्याने एक प्रश्न विचारला. किंबहुना त्याने शाहरुखकडे त्याचा फोन नंबर मागितला. तुम्ही मला तुमचा फोन नंबर द्याल का? असे एका चाहत्याने ट्विट करत शाहरुखला विचारले. त्याला निराश न करता शाहरुखने त्याच्याच शैलीत उत्तर दिले, मी तुला माझा फोन नंबर देतो, त्यासोबतच आधार क्रमांकही देऊ का?

किंग खानचे हे ट्विट पाहून त्या चाहत्याने म्हटले, मला तुमचा फोन नंबरही नकोय आणि तुमचा आधार क्रमांकही नको आहे. मला फक्त तुम्हाला एकदा भेटायचे आहे. अशी इच्छा त्या चाहत्याने व्यक्त केली. त्याची ही इच्छा पूर्ण करण्याचे म्हणत शाहरुखनेही त्याला निराश केले नाही. शाहरुख सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच चाहत्यांच्या संपर्कात असतो. जास्तीत जास्त चाहत्यांच्या ट्विटला उत्तर देत शाहरुख नेहमीच हे अनोखो नाते जपण्याचा प्रयत्न करतो. म्हणूनच की काय, तो खऱ्या अर्थाने किंग ठरला आहे.

वाचा : ‘जब वी मेट’मधील गीतचा प्रियकर आठवतोय…

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 11, 2017 5:20 pm

Web Title: bollywood actor shah rukh khans fan want his mobile number and he gives the super funny answer
Next Stories
1 Padman new poster: ‘ही’ अनोखी क्रांती घडवण्यासाठी अक्षय सज्ज
2 BLOG : अभिनयातील अनभिषिक्त सम्राट दिलीप कुमार!
3 ‘क्योंकी सास भी…’फेम जया करतेय आर्थिक अडचणींचा सामना
Just Now!
X