19 September 2020

News Flash

शाहिद- मीराच्या मुलाचं नाव….

शाहिदच्या मुलीचं नाव जितकं वेगळं आणि लक्षवेधी होतं तितकच त्याच्या मुलाचं नावही वेगळं आहे.

शाहिद कपूर, मीरा कपूर

बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर आणि त्याची पत्नी मीरा राजपूत कपूर यांच्या आयुष्यात एका नव्या पाहुण्याचा प्रवेश झाला. सोशल मीडियावरही शाहिदच्या मुलाचं मोठ्या प्रेमाने स्वागत करण्यात आलं. ज्यानंतर आता त्या चिमुरड्याचं नाव सर्वांसमोर जाहीर करण्यात आलं आहे. खुद्द शाहिदनेच त्याच्या मुलाचं नाव सर्वांना सांगितलं आहे.

‘झैनच्या येण्याने आमचं कुटुंब पूर्ण झालं आहे… तुम्ही सर्वांनी दिलेल्या शुभेच्छा आणि आशीर्वादांविषयी मी सर्वांचा आभारी आहे. सध्याच्या घडीला माझा आनंद गगनात मावेनासा झाला आहे’, असं ट्विट त्याने केलं.

शाहिदच्या मुलीचं नाव जितकं वेगळं आणि लक्षवेधी होतं तितकच त्याच्या मुलाचं नावही वेगळं आणि चर्चेत येणारं ठरलं आहे. झैन या शब्दाचा अर्थ होतो, सौंदर्य. नावाचा अर्थच इतका सुरेख आहे, तर आता शाहिदचा मुलगा किती गोंडस असणार हेच पाहण्यासाठी सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 7, 2018 5:02 pm

Web Title: bollywood actor shahid kapoor and mira rajput name their baby boy zain kapoor
Next Stories
1 नव्या इनिंगच्या तयारीत वरुण
2 #LailaMajnu : ‘या’ कारणांसाठी लैला-मजनू एकदा पाहाच
3 निर्मल सोनी नवे ‘डॉ. हाथी’!
Just Now!
X