News Flash

शाहरुखने माझं आयुष्य उध्वस्त केलं, त्या तरुणीचा आरोप

प्रत्येक रुपात शाहरुखने प्रेमाची नवी समीकरणं उलगडत चाहत्यांना आपल्या प्रेमात पाडलं. या चाहत्यांच्या गर्दीत तरुणींची संख्या तुलनेने जास्त.

शाहरुख खान

नव्वदच्या दशकापासून ते आतापर्यंत चाहत्यांच्या मनावर राज्य करणारा अभिनेता म्हणजे शाहरुख खान. ‘राहुल’ असो किंवा ‘राज’. प्रत्येक रुपात शाहरुखने प्रेमाची नवी समीकरणं उलगडत चाहत्यांना आपल्या प्रेमात पाडलं. अशा या चाहत्यांमध्ये तरुणींची संख्या तुलनेने जास्त. त्यातीलच एका तरुणीने शाहरुखवर चक्क तिचं आयुष्य उध्वस्त केल्याचं म्हणत सर्वांचं लक्ष वेधलं आहे.

तिने सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून शाहरुखवर आपलं आयुष्य उध्वस्त केल्याचा आरोप केला आहे. आता हे सर्व प्रकरण आहे तरी काय, याविषयीच तुमच्याही मनात काही प्रश्न घर करु लागले ना? इन्स्टाग्रामवर ‘ऑफिशियल ह्युमन्स ऑफ बॉम्बे’ नावाचं एक पेज आहे. त्या पेजवर अनेकांच्या आयुष्यातील विविध अनुभव शेअर केले जातात. त्यातच एका तरुणीचे तिची प्रेमकहाणी शेअर करत आपलं आयुष्य उध्वस्त करण्यात शाहरुखचा हात असल्याचं म्हटलं.

रोमॅन्टिक हिरो म्हणून शाहरुखच्या ओळखीमुळे त्याच्याचप्रमाणे आपल्या प्रियकरानेही आपल्याला मागणं घालावं, शाहरुख प्रमाणेच त्याचाही अंदाज असावा अशीच तिची अपेक्षा आहे. ज्यामुळेच ती शाहरुखवर आपल्याला उध्वस्त केल्याचा आरोप करत आहे. अर्थात ती हा आरोप गांभीर्याने करत नसून या पोस्टमधून तिच्यात दडलेली चाहतीसुद्धा हळूच डोकावत आहे.

पाहा : टेलिव्हिजनची बहुचर्चित जोडी अडकली विवाहबंधनात

तिने लिहिलेली पोस्ट पाहून शाहरुखची प्रत्येक चाहती यामध्ये स्वत:ला शोधू शकतेय असंच म्हणावं लागेल. ‘शाहरुख खानने माझं आयुष्य उध्वस्त केलं आहे. लहानपणापासूनच मी एका परफेक्ट प्रपोजलचं स्वप्न पाहात होते. व्हायोलिन वाजतंय, तो हळूवारपणे माझ्याकडे चालत येतोय, वाऱ्याची झुळूक येतेय, ज्यामुळे माझे केस हलकेच उडत आहेत, तो गुडघ्यांवर बसून मला प्रपोज करतोय वगैरे वगैरे. पण, असं कधी झालच नाही. याउट सर्व गोंधळच झाला….’, असं लिहित तिने पुढे आपल्या प्रेमकहाणीचा उलगडा केला. या पोस्टच्या निमित्ताने तिची प्रेमकहाणी सर्वांसमोर आलीच पण, त्यासोबतच चित्रपटांप्रमाणे दैनंदिन आयुष्यातही तशाच गोष्टी घडतील याची अपेक्षा न केलेलीच बरी हेसुद्धा स्पष्ट झालं.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 20, 2018 1:14 pm

Web Title: bollywood actor shahrukh khan ruined my life says a girl on social media
Next Stories
1 सुनील ग्रोवरला जॅकपॉट; सलमानसोबत चित्रपटात करणार काम
2 ‘केसरी’च्या शूटिंगदरम्यान अक्षयला दुखापत, उपचारासाठी मुंबईला परतण्यास दिला नकार
3 जगातील सर्वात प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत दीपिका, विराट कोहली !
Just Now!
X