News Flash

माझी नक्कल करतेवेळी मर्यादा न ओलांडण्याची ताकीद सोनाक्षीने कपिलला दिली होती- शत्रुघ्न सिन्हा

निदान आतातरी पुनर्पदार्पणाचा मानस बाळगणारा कपिल या सर्व गोष्टींवर लक्ष देत काही गोष्टींध्ये सुधारणा करतो का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

कपिल शर्मा, सोनाक्षी सिन्हा, शत्रुघ्न सिन्हा

आपल्या विनोदबुद्धीच्या बळावर या कलाविश्वात प्रसिद्धीझोतात आलेला कपिल शर्मा सध्या मात्र कुठेच दिसत नाहीये. सहकलाकारांसोबतचा वाद, खासगी आयुष्यात आलेलं वादळ या सर्व गोष्टींचा सामना करणाऱ्या कपिलला अति मद्यसेवन आणि नैराश्यामुळे बऱ्याच अडचणींचाही सामना करावा लागला. एकेकाळी सर्वच कलाकारांच्या पसंतीचा त्याचा कार्यक्रम पाहता पाहता इतक्या मागे पडला की सध्या कपिल शर्मा या नावाचा प्रेक्षकांना हळूहळू विसर पडू लागल्याचं दिसत आहे. कपिलच्या वागण्यामुळेही अनेक कलाकारांनी त्याच्याविषयीची तक्रार केली होती. यातच ज्येष्ठ अभिनेते श्त्रुघ्न सिन्हा यांच्या नावाचाही समावेश झाला आहे.

कपिलने आपली नक्कल करतेवेळी अनेकदा मर्यादा ओलांडल्या ज्यामुळे माझ्या मुलीने म्हणजेच अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिनेही त्याला ताकीद दिली होती, असं त्यांनी म्हटल्याचं वृत्त ‘इंडिया टुडे’ने प्रसिद्ध केलं आहे. ‘मी या सर्व गोष्टी फारश्या मनावर घेत नाही. लता मंगेशकर, आशा भोसले, अमिताभ बच्चन या सर्वच महान कलाकारांची नक्कल केली जाते. पण, जोपर्यंत या सर्व गोष्टी मर्याचा ओलांडत नाहीत तोपर्यंत हे सारंकाही ठीक असतं. या साऱ्याचा अंदाज मला तेव्हा आला जेव्हा कपिलने त्याच्या कार्यक्रमात माझी खिल्ली उडवली होती. त्याचवेळी सोनाक्षीने त्याला असं न करण्याची ताकीद दिली होती. कारण कोणत्याच बाबतीच आपल्या मर्यादा ओलांडल्या गेल्या नाही पाहिजेत’, असं ते मुलाखतीत म्हणाले.

वाचा : त्याची चोरी मी पकडली होती, एक्स बॉयफ्रेंडविषयी दीपिकाने केला खुलासा

शत्रुघ्न सिन्हा यांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा कपिल चर्चेत आला आहे. पण, या चर्चा त्याच्या कारकिर्दीच्या दृष्टीने पूरक नाहीत हेसुद्धा तितकच खरं आहे. त्यामुळे निदान आतातरी पुनर्पदार्पणाचा मानस बाळगणारा कपिल या सर्व गोष्टींवर लक्ष देत काही गोष्टींध्ये सुधारणा करतो का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 10, 2018 10:34 am

Web Title: bollywood actor shatrughan sinha says sonakshi warned comedian kapil sharma about not crossing the line with her dad
Next Stories
1 ..म्हणून प्रियांका करतेय सलमानची मनधरणी
2 फरहानसोबतच्या नात्याविषयी शिबानीने अखेर सोडलं मौन
3 VIDEO: कियाराचं नाव घेताच सिद्धार्थ म्हणाला…
Just Now!
X