23 January 2018

News Flash

सुशांत सिंग राजपूतची भर रस्त्यात शिवीगाळ

त्याला माध्यमांच्या प्रश्नांचा सामना करावा लागणार हे नक्की

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: August 11, 2017 10:50 AM

छाया सौजन्य- न्यूज १८

अभिनेता सुशांत सिंग राजपूत त्याच्या चित्रपटांपेक्षा वादांमुळेच चर्चेत असल्याचं गेल्या काही दिवसांपासून पाहायला मिळत आहे. क्रिती सनॉनसोबतचं त्याचं नातं असो किंवा मग पुरस्कार सोहळ्यामध्ये त्याच्या चित्रपटांकडे केलेला काणा डोळा असो, सुशांतच्या रागाचा पारा अनेकदा चढल्याचं पाहायला मिळालं आहे. हा अभिनेता पुन्हा एकदा चर्चेत आलाय तो म्हणजे अशाच एका घटनेमुळे. भर रस्त्यात शिवीगाळ केल्यामुळे सुशांतवर सर्वांच्याच नजरा खिळल्या आहेत. रस्त्यावर एका कार चालकाला या बॉलिवूड अभिनेत्याने शिवीगाळ केल्याचं वृत्त ‘न्यूज १८’ने प्रसिद्ध केलं आहे.

गुरुवारी संध्याकाळी मुंबईच्या गोरेगाव फिल्मसिटीजवळून जात असतानाच फिल्मसिटीच्या प्रवेशद्वाराजवळ ही घटना घडल्याचं म्हटलं जात आहे. एका दुसऱ्या कार चालकाने सुशांतच्या कारला ओव्हरटेक करत यू टर्न घेतला. तेव्हाच आपल्या कारला अशा प्रकारे ओव्हरटेक करुन गेलेल्या त्या व्यक्तीला सुशांतने शिवीगाळ केली. मुख्य म्हणजे त्या कार चालकानेही पुढे कार थांबवून सुशांतला त्याच भाषेत उत्तर दिलं.

पाहा : सलमान, हृतिकला टक्कर देतोय हा आयपीएस अधिकारी

हा सर्व प्रकार पाहण्यासाठी बघ्यांचीही प्रचंड गर्दी जमली होती. सुशांत सिंग राजपूतकडून अद्यापही यासंबंधी कोणतीही माहिती देण्यात आली नाहीये. त्यामुळे आता येत्या काळात चित्रपटाच्या निमित्ताने किंवा इतर काही कारणास्तव विविध कार्यक्रमांना हजेरी लावणाऱ्या या अभिनेत्याला याप्रकरणी माध्यमांच्या प्रश्नांचा सामना करावा लागणार हे नक्की. सध्या सुशांत ‘चंदा मामा दूर के’ या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. त्यासाठी त्याने नासामध्येही रितसर प्रशिक्षण घेतलं असून, तो अनुभव अविस्मरणीय होता, असंही त्याने स्पष्ट केलं होतं.

First Published on August 11, 2017 10:50 am

Web Title: bollywood actor sushant singh rajput fought on the road driver
  1. No Comments.