03 March 2021

News Flash

नव्या घरासाठी टायगरने मोजलेली किंमत वाचून तुम्हालाही बसेल धक्का

मुंबईत घर खरेदी करण्यासाठी तितकीच किंमत मोजावी लागते हे खरं आहे. पण, सेलिब्रिटींच्या या आलिशान घरांची किंमत नेहमीच अनेकांना थक्क करुन जाते.

Tiger Shroff, टायगर श्रॉफ

स्वत:चं हक्काचं घर असावं असं प्रत्येकालाच वाटत असतं. त्याहूनही मुंबईसारख्या शहरात घर घेणं हे स्वप्न प्रत्येकजण उराशी बाळगून असतो. कलाविश्वातही सेलिब्रिटी या शहरात आपला हक्काचा आशियाना मिळवण्यासाठी धडपड करत असतात. त्यातही बरेच यामध्ये यशस्वीही होतात. अभिनेता शाहिद कपूर, प्रियांका चोप्रा, अनुष्का शर्मा आणि अशा बऱ्याच कलाकारांनी गेल्या वर्षभरात या शहरात नवी घरं घेतली. त्यातच आता अभिनेता टायगर श्रॉफच्या नावाचाही समावेश झाला आहे.

आठ बेडरुमचं घर त्यांने खरेदी केल्याचं म्हटलं जात आहे. ‘डीएनए’ने सुत्रांचा हवाला प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार खार पश्चिम येथे टायगरने ‘रुस्तमजी पॅरामाऊंट’मध्ये एकूण तीन फ्लॅट खरेदी केले आहेत. नवव्या मजल्यावर १,५०० चौरस फुट, एकवीसाव्या मजल्यावर १९०० आणि २१०० चौरस फुटांचे हे फ्लॅट असल्याचं कळत आहे. या तिनही घरांसाठी त्याने तितकी जास्त किंमतही मोजली आहे.

वाचा : चाचा- चाचींना सलाम: १३ हजार फुटांवर जवळपास ४५ वर्षे चालवतायेत ढाबा

नवव्या मजल्यावरच्या फ्लॅटसाठी त्याने जवळपास ७.६१ कोटी रुपये मोजले असून, एकविसाव्या मजल्यावरील दोन्ही फ्लॅटसाठी त्याला साधारण २२.३३ कोटी रुपये मोजावे लागल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. या साऱ्या प्रक्रियेमध्ये स्टँप ड्युटी वगैरेची किंमत जोडली तर नव्या घरासाठी टायगरने तब्बल ३१.५ कोटी रुपये खर्च केल्याचं कळत आहे.
मुंबईत घर खरेदी करण्यासाठी तितकीच किंमत मोजावी लागते हे खरं आहे. पण, सेलिब्रिटींच्या या आलिशान घरांची किंमत नेहमीच अनेकांना थक्क करुन जाते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 26, 2018 10:01 am

Web Title: bollywood actor tiger shroff has reportedly paid big amount for his 3 new apartments
Next Stories
1 #Gold : देश स्वतंत्र झाला, पण…
2 Kargil Vijay Diwas : जाणून घ्या, कारगिल युद्धाचं बॉलिवूडसोबतचं नातं
3 ताणमुक्तीची तान : डिटॉक्स, स्पा आणि प्राण्यांसोबत विरंगुळा
Just Now!
X