News Flash

टायगर श्रॉफचा डान्स पाहून अनुपम खेर म्हणाले, “मी ही असा डान्स करू शकतो पण…”

टायगरचा जबरदस्त डान्स

अभिनेता टायगर श्रॉफने डान्सच्या शैलीने बॉलिवूडमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. दमदार डान्स आणि फिटनेसमुळे टायगरने चाहत्यांची कायमचं मन जिंकली आहेत.

टायगर श्रॉफ सोशल मीडियावरदेखील चांगलाच अ‍ॅक्टीव असतो. डान्स, जीम किंवा स्टंट करतानाचे अनेक व्हिडीओ आणि फोटो तो चाहत्यांसोबत शेअर करत असतो. नुकताच टायगर श्रॉफने बॉलिवूड कोरिओग्राफर असलेल्या त्याच्या मित्रासोबतचा एक डान्स व्हिडीओ त्याच्य इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडीओला चाहत्य़ांनी चांगलीच पसंती दिलीय. मात्र या व्हिडीओवर अभिनेते अनुपम खेर यांनी दिलेल्या कमेंटने सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे.

टायगर श्रॉफने शेअर केलेल्या व्हिडीओत तो एका म्युझिकवर दमदार डान्स करताना दिसतोय. त्याच्या डान्सचं चाहत्यांसोबतच सेलिब्रिटींनीदेखील कौतुक केलं आहे. यात अभिनेते अनुपम खेर यांनी मजेशीर कमेंट केली आहे.” मी देखील असा डान्स करू शकतो …स्वप्नात” अशी कमेंट अनुपम खेर यांनी केली आहे. टायगरचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Tiger Shroff (@tigerjackieshroff)

नुकताच टायगरचा बहिण कृष्णा श्रॉफसोबतचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओत टायगर कृष्णाला किक मारण्याचं प्रशिक्षण देताना दिसत होता.

टायगर लवकरच ‘हिरोपंती-2’ या सिनेमातून झळकणार आहे. त्याचसोबत ‘गणपत’, बागी ४ या सिनेमातून त्याची दमदार अ‍ॅक्शन पाहायला मिळेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 26, 2021 4:27 pm

Web Title: bollywood actor tiger shroff share dance video anupam kher said i can dance like u but in dreams kpw 89
Next Stories
1 मुलांना सोडल्यामुळे अभिनेत्रीला सीरिजमधून दाखवला बाहेरचा रस्ता
2 …आणि गुरुजी म्हणाले,”रणबीरला हे काही जमणार नाही”; “त्यापेक्षा त्याला कराटे शिकवा”
3 अमिताभ-माधुरीसोबत केले होते काम; आता मोमोज विकून चालवतीये घर
Just Now!
X