16 December 2017

News Flash

अनपेक्षित लूकमुळे उदय होतोय ट्रोल

'दंगल २' या चित्रपटामध्ये आमिर ऐवजी उदय चोप्राची निवड करण्यात आली आहे...

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: October 5, 2017 2:32 PM

छाया सौजन्य- सोशल मीडिया

‘धूम’ चित्रपटातून अलीची भूमिका साकारणारा अभिनेता उदय चोप्रा सध्या त्याच्या स्थूल शरीरामुळे आणि अनपेक्षित लूकमुळे चर्चेत आला आहे. मुख्य म्हणजे त्याला अनेकांनी ओळखलंही नाही. गेल्या काही दिवसांपासून कोणत्याच चित्रपटात न झळकलेला उदय नेमका करतो तरी काय हा अनेकांच्याच मनातील प्रश्न होता. पण, या प्रश्नाचं उत्तर अशा प्रकारे मिळेल याचा विचारही कोणी केला नसेल.

अभिनेता इम्रान हाश्मीच्या घरातून बाहेर येताना दिसलेल्या उदयचे फोटो पाहून ट्विटर, फेसबुकवर अनेकांनी विनोदी कमेंट्स करण्यास सुरुवात केली. त्याची ही अवस्था पाहून एका युजरने लिहिलंय की, ‘जेव्हा तुम्हाला माहित असतं ती धूम ४ मध्ये तुमची निवड होणार नाहीये….’, तर दुसऱ्या एका युजरने याला तर ओळखणंच कठिण आहे.. अशी कमेंट केली. त्याचं वजन भलतंच वाढल्यामुळे प्रथमदर्शनी पाहून हा अनपेक्षित लूक अनेकांनाच खटकतोय.

वाचा : अभिनयाव्यतिरिक्त बॉलिवूडकरांचे ‘हे’ आहेत ‘इन्कम सोर्स’

‘दंगल २’ या चित्रपटामध्ये आमिर ऐवजी उदय चोप्राची निवड करण्यात आली आहे, असंही ट्विट एका युजरने केलं आहे. काहींनी तर त्याच्या या अवस्थेसाठी नर्गिससोबच्या नात्यात आलेल्या दुराव्याचे परिणाम म्हटलं आहे. उदय चोप्रा त्याच्या रिलेशनशिपमुळे नेहमीच चर्चेत असतो. अभिनेत्री नर्गिस फाख्रीसोबतच्या नात्यामुळे तो नेहमीच प्रकाशझोतात असायचा. पण, काही दिवसांपूर्वीच त्यांच्यात ब्रेकअप झाल्याचं वृत्तं समोर आलं होतं. त्या चर्चांमागोमागच उदयचं असं माध्यमांसमोर येणं अनेक प्रश्नांना तोंड फोडत आहे.

First Published on October 5, 2017 2:32 pm

Web Title: bollywood actor uday chopra being trolled on social media