गेल्या काही दिवसांपासून अभिनेता वरुण धवन त्याच्या आगामी चित्रपटाचे चित्रीकरण करत आहे. डेव्हिड धवन दिग्दर्शित ‘जुडवा २’ या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी तो आणि अभिनेत्री तापसी पन्नू लंडनला रवाना झाले आहेत. या चित्रपटासाठी हे दोन्ही कलाकार बरीच मेहनत घेत असल्याचे पाहायला मिळतेय. नुकतेच इन्स्टाग्रामवर पोस्ट करण्यात आलेल्या एका व्हिडिओमध्ये तापसी आणि वरुण ‘जुडवा’ या चित्रपटातील ‘उंची है बिल्डींग’ या गाण्यावर रिहर्सल करताना दिसत आहेत.

वरुण-तापसीच्या नृत्याची झलक पाहता अनेकांनाच सलमान खान आणि करिश्मा कपूरवर चित्रीत ‘उंची है बिल्डींग’ या गाण्याची आठवण झाल्यावाचून राहात नाही. बॉलिवूडमधील रिमेक चित्रपटांच्या यादीत ‘जुडवा २’ या चित्रपटाचाही समावेश झाला आहे. १९९७ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात अभिनेता सलमान खान, करिश्मा कपूर, रंभा, कादर खान, शक्ती कपूर यांच्या मुख्य भूमिका होत्या. अशा तगड्या स्टारकास्टचा सहभाग असलेल्या या चित्रपटाच्या दिग्दर्शनही धुराही स्वत: डेव्हिड धवन यांनीच सांभाळली आहे. त्यामुळे नाही म्हटले तरीही ‘जुडवा २’च्या रुपात वरुणसमोर हे एक प्रकारचे आव्हान आहे असेच म्हणावे लागेल. याआधी वरुणने त्याच्या वडिलांच्या दिग्दर्शनात ‘मै तेरा हिरो’ या चित्रपटात काम केले होते.

Marathi actor Ajinkya Deo play role in ranbir kapoor ramayan movie
अजिंक्य देव रणबीर कपूरच्या ‘या’ बहुचर्चित चित्रपटात झळकणार, व्यक्तिरेखेबाबत म्हणाले…
The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!
crew movie review by loksatta reshma raikwar
Crew Movie Review : रंजक सफर
artificial intelligence in indian movie
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्ता आणि भारतीय चित्रपट

‘जुडवा २’ विषयी ‘पीटीआय’ला दिलेल्या माहितीत वरुण म्हणाला, ‘या चित्रपटासाठी सलमानने मला एकच सल्ला दिला होता. तो म्हणजे नेहमी तुझ्या वडिलांचं ऐक. कोणत्याही बाबतीत अतिउत्साहीपणा दाखवू नकोस’. त्यामुळे सलमानचा सल्ला मिळवलेला वरुण प्रेक्षकांची मनं जिंकण्यात यशस्वी होतो का याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. गेल्या काही दिवसांपासून वरुण आणखी एका कारणामुळे चर्चेत आहे. ते कारण म्हणजे त्याची प्रेयसी नताशा दलाल. ‘खुल्लं खुल्ला प्यार करेंगे हम दोनो…’ असाच काहीसा पवित्रा घेत वरुण नताशासोबत बऱ्याच कार्यक्रमांना आणि बी- टाऊन पार्ट्यांना हजेरी लावत आहे.