23 November 2017

News Flash

शर्टलेस फोटो शेअर केल्यामुळे ‘हा’ अभिनेता झाला ट्रोल

त्याच्या या लूकवर अनेक तरुणी भाळल्या आहेत. पण...

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: September 14, 2017 8:14 PM

वरुण धवन

सेलिब्रिटींचा एखादा फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आल्यानंतर तो फोटो लाइक करणाऱ्यांसोबतच त्यावर टीका करणाऱ्यांचीही संख्या मोठी असते. या ट्रोलिंगमुळे अनेकदा सेलिब्रिटींना त्रास सहन करावा लागतो. यावेळी अभिनेता वरूण धवन या ट्रोलिंगचा बळी पडलाय.

वरुणने सोशल मीडियावर एक शर्टलेस फोटो शेअर केला होता. बुडापेस्टमध्ये आगामी चित्रपटाच्या तयारासाठी पोहोचलेल्या वरुणने #varuninbudapest असा हॅशटॅग लावत हा फोटो पोस्ट केलाय. फोटोत दिसणाऱ्या त्याच्या ‘सिक्स पॅक अॅब्स’ लूकवर अनेक तरुणी भाळल्या आहेत. पण, त्याच्या या पिळदार शरीरयष्टीमधील लूकची अनेकांनीच खिल्ली उडवली आहे.

वरुणची खिल्ली उडवली जाण्यामागचं कारण म्हणजे फोटोत दिसणारी त्याची अंतर्वस्त्रे. या फोटोमध्ये वरुणच्या अंतर्वस्त्रावरुन त्याची खिल्ली उडवली जातेय. ‘हा फुकटातच अंतवस्त्रांची जाहिरात करतोय’, असं एका युजरने म्हटलं आहे. तर एका युजरने उपरोधिकपणे, ‘अरेच्चा! याचे पाय तर अजूनही जमिनीवरच आहेत’, असं म्हटलं आहे. सोशल मीडियावर आपली अशा प्रकारे खिल्ली उडवली जात असल्याचं पाहून वरुणनेही अगदी धमाल शैलीत उत्तर देत सर्वांनाच शांत केल्याचं पाहायला मिळत आहे. सेलिब्रिटींना ट्रोल करणं ही काही नवी बाब नसली तरीही, गेल्या काही दिवसांपासून नेटिझन्स सर्व मर्यादा ओलांडत कमेंट्स करत असल्याचं लक्षात येतंय.

 

First Published on September 14, 2017 8:01 pm

Web Title: bollywood actor varun dhawan trolled on twitter by follower for his undergarments see pictures