News Flash

…म्हणून मास्क लावून फिरतोय हा बॉलिवूड अभिनेता

पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने काही महत्त्वाची पावले उचलण्याची गरज

वरुण धवन

देशाची राजधानी म्हणून ओळखल्या जाणऱ्या दिल्ली शहराला सध्या प्रदूषणाने विळखा घातला आहे. वायू प्रदूषणामुळे दिल्लीकर इतके त्रस्त आहेत की अनेकांनी घराबाहेर पडणेही टाळले आहे. दिल्लीत सध्या प्रत्येकजण आपापल्या कामाच्या निमित्ताने बाहेर पडताना प्रदूषणापासून वाचण्यासाठी चेहऱ्यावर मास्क लावण्याला प्राधान्य देतो. सर्वसामान्यच नव्हे, तर बॉलिवूड सेलिब्रिटींनाही दिल्लीच्या या प्रदूषणामुळे प्रचंड त्रास होत असून, अखेर त्यांनाही चेहऱ्यावर मास्क लावावा लागला आहे. अभिनेता वरुण धवनने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक फोटो शेअर करत सर्वांचेच लक्ष वेधले आहे.

वरुणने दिल्लीतील सध्याच्या वातावरणाचा फोटो क्लिक करत तिथे नेमकी काय परिस्थिती आहे हे सर्वांसमोर उघड केले. धुरक्यामुळे दिल्लीत प्रचंड अडचणी येत असून, या साऱ्यामुळे त्याने एका महत्त्वाच्या प्रश्नाकडेही नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे. ‘मी कोणालाच याबद्दल (प्रदूषणाबद्दल) दोष देत नाही. कारण इतरांप्रमाणेच मीसुद्धा यासाठी तितकाच जबाबदार आहे. पण, आता एकमेकांवर आणि सरकारी धोरणांवर आरोप लावण्याऐवजी आपण स्वत:मध्ये काही महत्त्वाचे बदल घडवून आणण्याची गरज आहे’, असे त्याने या ‘इन्स्टा पोस्ट’मध्ये म्हटले. त्यासोबतच या पोस्टमध्ये त्याने ‘गो ग्रीन’चा मंत्र देत #delhichokes असा हॅशटॅगही जोडला आहे.

वाचा : अभिनयाव्यतिरिक्त बॉलिवूडकरांचे ‘हे’ आहेत ‘इन्कम सोर्स’

#delhichokes या हॅशटॅगअंतर्गत बऱ्याच नेटकऱ्यांनी विविध पोस्ट करत दिल्लीतील जीवघेण्या प्रदूषणाकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. दिल्लीमध्ये धुरक्याचे प्रमाण इतके वाढले आहे की त्यामुळे सर्व प्राथमिक शाळांनाही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’ने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पर्यावरणीय आणीबाणी जाहीर करण्याचीही विनंती केली. त्यामुळे आता या भीषण परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी सर्वसामान्यांनीच पुढे येत पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने काही महत्त्वाची पावले उचलण्याची आणि उपक्रम राबवण्याची गरज असून, त्यात मोठ्या संख्येने सहभागी होण्याची प्रकर्षाने गरज वाटू लागली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 8, 2017 12:32 pm

Web Title: bollywood actor varuna dhawan shared a photo wearing a mask to show the rise in dangerous level of air pollution in delhi
Next Stories
1 भन्साळीसारख्यांना फक्त चपलांची भाषा समजते- भाजप खासदार
2 करिना पूर्ण करणार का सोनम कपूरची इच्छा ?
3 आजचे ‘डुडल’ सितारा देवींना समर्पित
Just Now!
X