News Flash

‘वाँटेड’ हीरो!

चुलबुल पांडे असो वा राधे या व्यक्तिरेखा पडद्यावर जशा आहेत तसं आपण खरोखरच वास्तव आयुष्यात वागू शकत नाही.

त्याच्या पडद्यावरच्या प्रवेशाला टाळ्यांच्या गजराची दाद, त्याच्या डायलॉग्जवर शिट्यांचा पाऊस हे चित्र फक्त आणि फक्त सलमान खानच्या चित्रपटावेळी चित्रपटगृहातून दिसते. गर्दी खेचणारा कलाकार म्हणून त्याचा लौकिक त्याने कायम ठेवला आहे, पण याचा अर्थ त्याचे चित्रपट आणि तो साकारत असलेल्या व्यक्तिरेखा या आदर्शवादी असतात असा होत नाही. किं बहूना, आपण साकारलेल्या अनेक  व्यक्तिरेखा या खोट्या आणि फक्त पडद्यावर शोभून दिसणाऱ्या आहेत असं तो स्वत: कबूल करतो. पण लोकांना त्याचे सुमार मनोरंजन देणारे चित्रपटही आवडतात आणि जे त्याच्या चाहत्यांना आवडतं तेच तो करत राहतो.

सलमान खानचा ‘दबंग ३’ २०१९ मध्ये प्रदर्शित झाला होता. त्यानंतर म्हणजे २०२० मध्येच तो ‘राधे : युवर मोस्ट वाँटेड भाई’ या चित्रपटातून तो लोकांसमोर आला असता, पण करोनामुळे त्याचं येणं वर्षभराने लांबलं आणि अखेर या ईदच्या मुहूर्तावर त्याचा हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे. ‘राधे’ हा चित्रपट ‘वाँटेड’ या प्रभुदेवा दिग्दर्शित चित्रपटाचाच सिक्वल असल्याची चर्चा होती, मात्र प्रत्यक्षात हा चित्रपट पूर्णपणे वेगळा आहे, असं तो सांगतो. या चित्रपटात तीन खलनायकी व्यक्तिरेखा आहेत. रणदीप हुडा, गौतम गुलाटी आणि सँग हे या तिघांनी साकारलेले खलनायक हे वेगळे आणि निर्दयी असे आहेत. या तिघांनीही आपापल्या व्यक्तिरेखा साकारण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे आणि त्या तिघांमुळे चित्रपटाच्या कथेला बळकटी मिळाली आहे, असं सलमान म्हणतो. त्याचा चित्रपट चित्रपटगृहातून प्रदर्शित व्हावा, अशीच सगळ्यांची इच्छा असते. मात्र यावेळी करोनामुळे देशभरातील परिस्थिती लक्षात घेता शक्य तितक्या माध्यमातून चित्रपट लोकांसमोर आणणे ही पहिली गरज होती. एके काळी आपणही चाहत्याच्या भूमिके त होतो आणि हिरोला जशा टाळ्या मिळतात तशा आपल्यालाही मिळाव्यात अशी इच्छा मनात होती, अशी आठवण त्याने सांगितली. एकाअर्थी आपण याच हिरोच्या रुपात लोकांसमोर आलं पाहिजे या एकमेव उद्देशाने बनवलेल्या आपल्या चित्रपटांमधील व्यक्तिरेखा या आदर्श नाहीत, असंही तो सांगतो. चुलबुल पांडे असो वा राधे या व्यक्तिरेखा पडद्यावर जशा आहेत तसं आपण खरोखरच वास्तव आयुष्यात वागू शकत नाही. मी जर खरंच पांडेसारखा वागलो तर मला वडिलांच्या रोषाला सामोरं जावं लागेल, घरचे वैतागतील. त्यामुळे घरी मी त्यांचा मुलगा, भाऊ म्हणूनच वावरणार. फारतर ‘बजरंगी भाईजान’मधील माझ्या व्यक्तिरेखेसारखे व्हावेसे मला वाटते, असं तो म्हणतो.

आत्तापर्यंत एखादा चित्रपट किंवा एखादी भूमिका करायची की नाही हा निर्णय आपण आपल्या विचारानेच घेत आलो आहोत, असं तो म्हणतो. माझ्या मनाने दिलेला कौल मी स्वीकारत आलो आहे, त्यामुळे

अनेकदा मी संकटातही सापडलो आहे, अनेकदा माझा गैरफायदाही घेतला गेला आहे, असे तो सांगतो. मात्र काहीही झाले तरी माझा विचार बरोबर होता हे कालांतराने का होईना लक्षात येतं. म्हणून आजही आपल्या अंत:प्रेरणेनुसारच वाटचाल करत असल्याचे त्याने स्पष्ट के ले. सलमानच्या तद्दन मसालापटांमध्ये तोच तोचपणा जाणवू लागल्याच्याही तक्रारी आहेत, त्याला मात्र ते मान्य नाही. प्रत्येक वेळी नवीन गोष्ट असावी, नवीन व्यक्तिरेखा असावी यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न के ले जातात. आत्ताही तुम्ही ‘राधे’ पहा आणि मग तोच तोचपणा काय आहे ते मला सांगा, असं आवाहन तो करतो. सलमान म्हणजे मी ‘मैने प्यार किया’ या माझ्या चित्रपटापासून तसाच आहे आणि यापुढेही राहणार, पण माझ्या व्यक्तिरेखा मात्र चित्रपटागणिक बदलत राहतात, असं तो स्पष्ट करतो. सलमान हा तसा अ‍ॅक्शन हिरो नाही की चॉकलेट हिरोही नाही. त्याच्या सगळ्या चित्रपटांमध्ये थोडं प्रेम, थोडी अ‍ॅक्शन असा सगळा मालमसाला एकत्र असतो. त्याच्या मते नायिके ला पटवण्यापासून तिच्याशी प्रेमगोष्टी करत राहणारा असा मी नाही किं वा अ‍ॅक्शन हिरो म्हणून प्रत्येक प्रसंगात ५० ते ६० लोकांना दे मार करणारा असाही मी नाही. मला माझ्या क्षमता माहिती आहेत. मी किती स्टंट करतो आणि माझा बॉडी डबल किती करणार?, याची मला पुरेपूर कल्पना आहे. मी माझ्या पध्दतीने भूमिका करतो, असं तो म्हणतो. ‘राधे’ यशस्वी ठरो वा ना ठरो… त्याची पुढची वाटचाल अशीच सलमान खाक्यात सुरू राहणार हे तो पुन्हा पुन्हा सांगतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 16, 2021 2:25 pm

Web Title: bollywood actor wanted hero salman khan artist personality idealistic akp 94
Next Stories
1 लोककलावंतांची नाराजी
2 ‘कंदील’ चित्रपटाचे पोस्टर प्रकाशित
3 “नाहीतर तर तुमच्या अडचणी वाढतील”; सलमान खानचा संतप्त इशारा
Just Now!
X