29 September 2020

News Flash

जस्टिनसाठी किंग खान आणि सलमान पार्टीचं आयोजन करयायेत खरं, पण….

'पर्पज वर्ल्ड टूर'च्या निमित्ताने १० मे रोजी नवी मुंबईत जस्टिनचा लाइव्ह कॉन्सर्ट

सलमान खान, शाहरुख खान, जस्टिन बिबर

कॅनेडियन पॉपस्टार जस्टिन बिबर भारतात येणार असल्यामुळे सध्या सर्वत्र ‘पॉप’चेच वारे वाहात आहेत. जस्टिन भारतात येणार हे काही महिन्यांपूर्वीच जाहीर करण्यात आलं. त्यानंतर त्याच्या चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं. मुख्य म्हणजे या ग्लोबल सेलिब्रिटीच्या स्वागतासाठी बॉलिवूडही सज्ज झालं आहे. ‘पर्पज वर्ल्ड टूर’ अंतर्गत १० मे रोजी जस्टिन नवी मुंबईतील डी.वाय. पाटील स्टेडियममध्ये लाइव्ह कॉन्सर्टमध्ये परफॉर्म करणार आहे. या कॉन्सर्टनंतर जस्टिनच्या पाहुणचारासाठी अभिनेता शाहरुख खान, सलमान खान यांच्यासोबतच उद्योगपती मुकेश अंबानी खास पार्टीचं आयोजन करण्याचा बेत आखत आहेत.

बॉलिवूडकरांच्या या पार्टीला जस्टिन हजर राहणार का? हाच प्रश्न सर्वांच्या मनात घर करत आहे. जस्टिनने या दौऱ्यासाठी केलेल्या मागण्या पाहता तो खान अभिनेते आयोजित करत असलेल्या पार्टीला उपस्थित राहणार की नाही, असा प्रश्न उभा राहिला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘जस्टिनचं मुंबईत आगमन झाल्यानंतरच त्याच्या कार्यक्रमाची रुपरेषा लक्षात येणार आहे. या प्रसिद्ध कलाकाराच्या भारत दौऱ्यासाठी स्टार किड्सही फार उत्साहात आहेत. शाहरुखचा मुलगा आर्यन खान, मुकेश अंबानींचा मुलगा आकाश आणि सलमानच्या घरातील तरुण मंडळीसुद्धा या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

कोणत्याही विदेशी कलाकाराच्या भारत दौऱ्यादरम्यान शाहरुख आणि सलमान नेहमीच मोठ्या मनाने त्यांचं आदरातिथ्य करतात. याचच उदाहरण काही महिन्यांपूर्वी पार पडलेल्या ग्लोबल सिटिझन कॉन्सर्टदरम्यान पाहायला मिळालं. कोल्डप्ले बॅण्डसाठी शाहरुखच्या मन्नतवर एका पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं, त्याच्या या पार्टीमध्ये जवळपास सर्वच बी- टाऊन कलाकारांनी हजेरी लावली होती. तेव्हा आता जस्टिनसाठी कोणती खास तयारी करण्यासाठी ही खान मंडळी भर देणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

जस्टिन बिबर आणि त्याच्या नावाभोवती असणारं प्रसिद्धीचं वलय पाहता १० तारखेला त्याच्या कॉन्सर्टमध्ये प्रेक्षकांची तुडुंब गर्दी होणार आहे. इथे लक्षात घेण्याची बाब म्हणजे त्याच्या कॉन्सर्टची तिकीटं चक्क ईएमआयवरही विकली जात आहेत. यामध्ये एका तिकीटासाठी कमीत कमी ५०४० रुपये तर जास्तीत जास्त १५४०० रुपये मोजावे लागणार आहेत. तेव्हा जर का तुम्हीही जस्टिनच्या कॉन्सर्टला जाणार असाल तर ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरुर कळवा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 5, 2017 6:42 pm

Web Title: bollywood actors salman khan and shah rukh khan all set to throw a bash for pop star justin bieber but will he attend the party
Next Stories
1 सनी लिओनीचे मराठीत पदार्पण
2 ‘बाहुबली २’ चारवेळा पाहिल्यानंतर रामूची ‘ट्युबलाइट’वर कमेंट
3 ‘हर हर महादेव’ म्हणत ‘जाबाज ज्युलियाने’ केली गंगा आरती
Just Now!
X