News Flash

चिमुकल्या चाहतीसोबतचा ऐश्वर्याचा हा व्हिडिओ पाहिलात का?

ऐश्वर्याच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्याजोगा आहे.

ऐश्वर्या राय बच्चन

हिंदी चित्रपटसृष्टीची पताका परदेशातही तितक्याच आदबीने मिरवणाऱ्या काही सेलिब्रिटींमध्ये अभिनेत्री ऐश्वर्या रायचे नाव अग्रगणी आहे. आपल्या सौंदर्याने अनेकांनाच गारद करणाऱ्या या अभिनेत्रीचे चित्रपट असो किंवा तिचे स्मितहास्य प्रेक्षक घायाळ होतातच. गेल्या बऱ्याच वर्षांपासून हिंदी चित्रपटसृष्टीत नावारुपास आलेल्या ऐश्वर्याच्या चाहत्यांचा आकडाही दिवसेंदिवस वाढतच आहे. अशाच काही चाहत्यांनी या सुरेख अभिनेत्रीची भेट घेऊन तिला भेटण्याचा आनंद व्यक्त केला.

सहसा सेलिब्रिटींना भेटल्यानंतर चाहते भारावतात. पण, इथे मात्र वेगळच दृश्य पाहायला मिळालं. ‘बॉलिवूड नाऊ’च्या फेसबुक पेजवरुन प्रसिद्ध करण्यात आलेल्या एका व्हिडिओमध्ये आपल्या चाहत्यांची भेट घेतल्यानंतर कलाकार म्हणून ऐश्वर्याच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्याजोगा आहे. यामध्ये ती एका चिमुकल्या चाहतीसोबत संवाद साधताना दिसतेय. मुख्य म्हणजे इथे तिच्या भोवती अंगरक्षकांचा गराडाही नाहीये. त्यामुळे ऐश्वर्याशी नीट संवाद साधण्याची संधीही चाहत्यांना मिळाली.

वाचा : … म्हणून स्मिता पाटील अन्नू कपूर यांना सोडायला थेट विमानतळापर्यंत गेल्या होत्या

ऐश्वर्या आपल्या मुलीसोबत मेलबर्न येथे ‘आयएफएफएम २०१७’ मध्ये वेस्टपॅक अवॉर्डच्या रेड कार्पेट सोहळ्यासाठी पोहोचली होती. १२ ऑगस्टच्या सकाळी तिने ‘फेडरेशन स्क्वेअर’ येथे ध्वजारोहणही केले. या कार्यक्रमानंतर चाहत्यांसोबत सेल्फी काढणारी, दोन्ही हात जोडून त्यांच्या प्रेमाचा स्वीकार करणारी ऐश्वर्या पाहून तिचं अनेकांना कौतुक वाटत आहे. मुख्य म्हणजे फक्त भारतीयच नाही, तर इतर देशातील चाहतेही तिच्या प्रेमात असल्याचं व्हिडिओ पाहून लक्षात येते. एकीकडे चाहत्यांची आणि छायाचित्रकारांची गर्दी झाल्यावर चिडचिड करणारे कलाकार पाहता ऐश्वर्याचं हे असं वागणं मात्र प्रशंसनीय ठरत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 14, 2017 4:43 pm

Web Title: bollywood actress aishwarya rai bachchans cute side in this video when she met her fans
Next Stories
1 नवोदित गायकांसाठी ९१.१ एफएमची ‘रेडिओ सिटी सुपर सिंगर’ स्पर्धा
2 एकता कपूरमुळे पहलाज निहलानी यांना सोडावं लागलं अध्यक्षपद?
3 ‘या’ कारणामुळे झाला सुशांतचा पहिला ब्रेकअप
Just Now!
X