News Flash

VIDEO : मराठमोळ्या लावणीवर सनीचा ठसका

'झिंगाट'लाही टक्कर देतय हे गाणं

सनी लिओनी

मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये आता काही फार अंतर राहिलं नाहीये. बरेच मराठी आणि हिंदी कलाकार दोन्ही भाषांच्या चित्रपटांमध्ये सहजतेनं वावरत आहेत. मुख्य म्हणजे प्रेक्षकांनीही या गोष्टीचा स्वीकार केलाय. मराठी आणि हिंदी कलाकारांच्या या अशा कलात्मक देवाणघेवाणीमध्ये आता आणखी एका अभिनेत्रीच्या नावाचा समावेश झाला आहे. ती अभिनेत्री म्हणजे सनी लिओनी. सनीचं नाव काढताच तिचं ‘बेबी डॉल’ हे गाणं सर्वांच्याच डोळ्यांसमोर येतं पण, आता मात्र सनीची ओळख बदलण्याची काही चिन्हं आहेत. कारण, वेस्टर्न म्युझिकवर ठेका धरणारी सनी आता थेट मराठमोळी लावणी करत आहे.

‘बॉईज’ या आगामी मराठी चित्रपटामध्ये सनी ‘कुठं कुठं जायाचं हनिमूनला’ या मराठमोळ्या गाण्यावर थिरकताना दिसतेय. आपल्या घायाळ करणाऱ्या अदांनी प्रेक्षकांच्या मनावर भुरळ घालणाऱ्या सनीचा हा अंदाज सध्या अनेकांचच लक्ष वेधत आहे. या गाण्यात ती गडद भगव्या आणि हिरव्या रंगाच्या नऊवारीमध्ये दिसत आहे. मुख्य म्हणजे सनीच्या या नऊवारीला थोडा स्टायलिश टच देण्यात आला असून, हा टच देत असताना त्यातील पारंपारिक बाज तसाच ठेवण्यात आला आहे.

वाचा : शब्दांच्या पलिकडले : ‘ओ मेहबूबा… ओ मेहबूबा… मेरे दिल के पास’

‘कुठं कुठं जायाचं हनिमूमला’ आणि ‘मेरा बाबू’ या दोन गाण्यांचं मॅशअप आणि त्यावर थिरकणारी सनी या गाण्याला चार चाँद लावत आहे. त्यामुळे या चित्रपटाविषयी प्रेक्षकांची उत्सुकता वाढण्यामागचं एक कारण सनी ठरू शकते असं म्हणायला हरकत नाही. सुनिधी चौहानने गायलेलं हे गाणं येत्या काही दिवसांमध्ये ‘झिंगाट’ आणि इतर काही उडत्या चालीच्या गाण्यांनाही टक्कर देईल असंच म्हणावं लागेल. सनी लिओनी गेल्या बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. त्यामागे टेलिव्हिजन शोपासून ते अगदी लातूरच्या निशाचं मातृत्त्वं स्वीकारण्यापर्यंतच्या चर्चा पाहायला मिळत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 17, 2017 10:00 am

Web Title: bollywood actress aka baby doll sunny leones new song kutha kutha jayacha honeymoon la video
Next Stories
1 तिरंग्याच्या दुपट्ट्याचे ‘बूमरँग’ प्रियांकावरच उलटले!, नेटिझन्सकडून टीका
2 भाडं थकवल्यामुळे लता रजनीकांत यांच्या शाळेला टाळं
3 ‘पहरेदार पिया की’ मध्ये चुकीचे दाखवलेले नाही’
Just Now!
X