अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट येत्या काळात त्यांच्या नात्याची अधिकृत घोषणा करण्याची चिन्हं आहेत. मुख्य म्हणजे याआधी रणबीरने मुलाखतींमध्ये आपण आलियाला डेट करत असल्याचं कबुल केलं होतं. त्यामागोमागच आलियानेही आपण सिंगल नसल्याचं जाहीर केलं. सध्या त्यांच्या नात्याविषयी चर्चा रंगत आहेत की, रणबीर आणि आलियाचे कुटुंबीय त्यांच्या लग्नाची चर्चा करण्यासाठी भेटणार आहेत.
माध्यमांमध्ये सुरु असणाऱ्या चर्चांनुसार रणबीर आणि आलियाच्या चित्रपटांचं चित्रीकरण पूर्ण झाल्यानंतर येत्या काळात त्यांचे कुटुंबीय लंच किंवा डिनरसाठी एकत्र येणार असून औपचारिक गोष्टींविषयी चर्चा करणार आहेत. आलिया आणि रणबीरच्या नात्यात आलेली सहजता आणि त्यांचा एकमेकांवर असणारा विश्वास पाहता ही भेट कोणा एकाच्या निवासस्थानीच होणार असल्याचंही म्हटलं जात आहे. त्यामुळे आता येत्या काही महिन्यांमध्ये बी- टाऊनचं हे क्युट कपल त्यांच्या नात्याला नवं वळण देतं का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
वाचा : सर्वत्र व्हायरल होणाऱ्या ‘त्या’ मीम्सविषयी राधिकाची प्रतिक्रिया वाचली का?
दरम्यान, आलिया आणि रणबीरच्या घरी त्यांच्या नात्याविषयी सर्व माहिती असून, दोघांच्याही नात्याला घरच्यांची संमती असल्याचं स्पष्ट झालं आहे. काही दिवसांपूर्वीच रणबीरच्या कुटुंबीयांसोबत आलियाला पाहिलंही गेलं होतं. सध्याच्या घडीला ते दोघंही ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र असून चित्रीकरणातून व्यग्र झाल्यानंतरच ते आपल्या खासगी आयुष्याकडे लक्ष देणार असल्याचं कळत आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on August 30, 2018 5:53 pm