23 November 2017

News Flash

घटस्फोटासाठी अभिनेत्रीने केली पतीकडे पैशांची मागणी

त्यांच्या नात्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: March 21, 2017 5:16 PM

अलिसा खान

कलाकारांची नाती आणि त्या नात्यांविषयी नेहमीच विविध चर्चा रंगल्याचे पाहायला मिळतात. असेच काहीसे अभिनेत्री अलिसा खानसोबत झाल्याचे पाहायला मिळत आहे. सध्या ही अभिनेत्री चर्चेत आहे ते म्हणजे तिच्या खासगी आयुष्यामुळे. अलिसा खान आणि तिचा पती लव कपूर यांच्या नात्यामध्ये सध्या तणावाचे वातावरण असून त्यांच्या नात्यात दुरावा आला आहे. अलिसाच्या पतीने न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. याच अर्जाविषयी निर्णयाच्या सुनावणीसाठी अलिसाने शुक्रवारी कौटुंबिक न्यायालयात हजेरी लावली होती.

सुनावणीदरम्यान अलिसाने दुसरी याचिका दाखल करत घटस्फोटाचा खटला लढण्यासाठीचा खर्च देण्यासंबंधीची मागणी केली आहे. मुळच्या गाझियाबादच्या अलिसाने गेल्या वर्षी हरिद्वारस्थित एका निर्मात्याशी लग्न केले होते. पण, काही वेळानंतरच त्या दोघांच्याही नात्यात वादाला तोंड फुटले आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले. सूत्रांच्या माहितीनुसार अलिसा आणि लवच्या नात्यातील वाद विकोपाला गेला ज्यामुळे शेवटी तिच्या पतीने घटस्फोटासाठी न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला.

घटस्फोटाच्या खटल्याच्या सुनावणीसाठी हरिद्वार कौटुंबिक न्यायालयात गेलेल्या अलिसाने तिच्या वकिलांच्या सहाय्याने दुसरी याचिका दाखल केली. हा खटला लढविण्यासाठी अलिसाकडे पैसे नसल्याचे म्हटले जात आहे. त्यासाठीच तिने खटला लढविण्यासाठी या याचिकेद्वारे पैशांची मागणी केली आहे. त्यामुळे आता अलिसाच्या या याचिकेवर न्यायालय काय निर्णय देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. अलिसा ही गाझियाबादच्या वजीर गाजी-उद्दीनच्या घराण्यातील आहे. अलिसाच्या पूर्वजांनी गाजियाबाद शहर वसवल्याचे म्हटले जाते. तिने ‘माय हसबण्डस वाइफ’ या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती.

alisa-khan_1

First Published on February 17, 2017 6:11 pm

Web Title: bollywood actress alisa khan sought money for divorce from husband