News Flash

‘कुछ बातों का जवाब सिर्फ…’; अंकिता लोखंडेने शेअर केला खास व्हिडीओ

अंकिताने शेअर केला खास व्हिडीओ

कलाविश्वाप्रमाणेच सोशल मीडियावर सक्रीय असणारी अभिनेत्री म्हणजे अंकिता लोखंडे. कोणताही सण, उत्सव असो किंवा एखादं नवं फोटोशूट, व्हिडीओ शूट अंकिता कायमच तिच्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. यामध्ये अलिकडेच अंकिताने एक सुंदर व्हिडीओ शेअर केला आहे.

अंकिताने काही फोटोंचा कोलाज तयार करुन त्याचा व्हिडीओ केला आहे. या व्हिडीओमध्ये अंकिताने मनमोहक पोझ दिल्या असून तिच्या सौंदर्याची सध्या चाहत्यांमध्ये चर्चा रंगली आहे. ‘कुछ बातों का जवाब सिर्फ ख़ामोशी होती है, और यकीन मनो ये बहुत खुबसूरत जवाब होता है’, असं कॅप्शन तिने या व्हिडीओला दिलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ankita Lokhande (@lokhandeankita)


दरम्यान, अंकिता ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आहे. ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून ती खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आली. त्याचप्रमाणे ती ‘मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी’ या चित्रपटातही झळकली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 26, 2020 6:21 pm

Web Title: bollywood actress ankita lokhande share new video ssj 93
Next Stories
1 लॉकडाउनच्या काळातही बॉलिवूडला नफा; सैफमुळे झाली ४०० कोटींची कमाई
2 जातीय व्यवस्थेवर अवधूत गुप्ते व्यक्त; पाहा, त्याचं नवं रॅप साँग
3 हा काय डान्स आहे का? ‘नागीन’ डान्सवर थिरकली राखी-राहुलची जोडी
Just Now!
X