20 September 2020

News Flash

बऱ्याच दिवसांनंतर चाहत्यांचं लक्ष वेधतोय ‘विरुष्का’चा सेल्फी

एखादी जाहिरात म्हणू नका किंवा मग फोटो. विराट-अनुष्काचं एकत्र असणं, एकत्र दिसणं ही त्यांच्या चाहत्यांसाठी खूप मोठी बाब आहे.

विराट कोहली, अनुष्का शर्मा

Anushka Sharma and Virat Kohli क्रिकेटपटू विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या अफेअरच्या चर्चांपासूनच सोशल मीडियावर या जोडीला पसंत केलं जाऊ लागलं. पुढे जाऊन त्यांनी लग्नगाठ बांधत आपल्या नात्याची नवी सुरुवातही केली. या साऱ्यामध्ये विराटने नेहमीच अनुष्कासोबतच्या नात्याच्याची उघडपणे ग्वाही दिली. तर, अनुष्का मात्र यामध्ये काहीशी मागे पडली. किंबहुना तिने काही गोष्टी खासगी आयुष्यापुरताच सीमित ठेवण्याला प्राधान्य दिलं. अशा या सेलिब्रिटी जोडीचा एक नवा सेल्फी नुकताच सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधत आहे.

विराट कोहलीने हा सेल्फी पोस्ट केला असून, ‘डे आऊट विथ माय ब्युटी’, असं कॅप्शन दिलं आहे. इंग्लंडच्या संघाविरुद्ध खेळल्या गेलेल्या टी२० मालिकेमध्ये भारतीय संघाला विजय मिळवून दिल्यानंतर विराटने त्याच्या आयुष्यातील खास व्यक्तीसोबत म्हणजेच अनुष्कासोबत काही क्षण व्यतीत केले. अनुष्काही तिच्या आगामी ‘सुई-धागा’ आणि ‘झिरो’ या चित्रपटांच्या चित्रीकरणाचं काम आटोपून विराटची भेट घेण्यासाठी गेल्याचं पाहायला मिळालं.

View this post on Instagram

Day out with my beauty! 🤩♥️

A post shared by Virat Kohli (@virat.kohli) on

वाचा : ..आणि अभिनयासाठी कवी कुमार आझादांनी सोडलं होतं घर!

एखादी जाहिरात म्हणू नका किंवा मग फोटो. विराट-अनुष्काचं एकत्र असणं, एकत्र दिसणं ही त्यांच्या चाहत्यांसाठी खूप मोठी बाब आहे. सोशल मीडियावर त्यांच्या फोटोंना लाखो लाइक्स आणि शेअर्सही मिळतात. त्यामुळे खऱ्या अर्था क्रीडा आणि कलाविश्वाला जोडणारी ही जोडी सुपरहीट ठरत आहे असं म्हणायला हरकत नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 11, 2018 10:24 am

Web Title: bollywood actress anushka sharma and cricketer husband virat kohlis day out in england see photo
Next Stories
1 ..म्हणूनच माझ्यावर टीका होते- सनी लिओनी
2 ‘या’ तारखेला प्रदर्शित होणार अक्षयकुमार-रजनीकांतचा ‘2.0’
3 ‘शुभ लग्न सावधान’साठी छापण्यात आली लग्नपत्रिका
Just Now!
X