25 September 2020

News Flash

इटलीत विराट-अनुष्काचा विवाहसोहळा संपन्न

इटलीतील टस्कनी येथे विवाहसोहळा पार पडला.

विराट कोहली, अनुष्का शर्मा

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा अखेर विवाहबंधनात अडकले. इटलीतील टस्कनी येथे विवाहसोहळा पार पडला. गेल्या आठवड्यापासून विराट- अनुष्काच्या लग्नाची जोरदार चर्चा होती. कोहली आणि शर्मा कुटुंबीय ८ तारखेलाच इटलीसाठी रवाना झालेले. लग्नाला जवळच्याच मित्र- परिवाराला आमंत्रित करण्यात आले आहे.

इटलीत लग्न कुठे होणार, कोणकोणत्या सेलिब्रिटींना आमंत्रित केलं गेलं, मुंबईत रिसेप्शन होणार का, अशा एक ना अनेक गोष्टींची चर्चा गेल्या काही दिवसांपासून होत आहे. मात्र, लग्नाबाबत कोणतीही ठोस माहिती अद्याप समोर आली नव्हती. अनुष्का आणि तिच्या कुटुंबीयांना मुंबई विमानतळावरून इटलीसाठी रवाना होताना पाहिलं गेलं, त्यावरूनच अंदाज खरा ठरल्याचं म्हटलं जात होतं.

विराट आणि अनुष्का हे २०१३ मध्ये एका शाम्पूच्या जाहिरातीदरम्यान भेटले होते. यानंतर जवळपास वर्षभराने एका फुटबॉल सामन्यादरम्यान दोघे एकत्र दिसले होते. यानंतर त्यांच्या प्रेमप्रकरणाची चर्चा सर्वत्र सुरू झाली होती. दरम्यान, या विवाहसोहळ्यासाठी काही निमंत्रितांनाच बोलावण्यात आले होते. यामुळे ‘विरुष्का’चे चाहते नाराज झाले होते. परंतु, येत्या २२ डिसेंबरला मुंबईमध्ये जय्यत स्वागतसमारंभ आयोजित करण्यात आल्याचे समजते.

इटलीतल्या टस्कनी इथल्या बोर्गो फिनोखिएतो Borgo Finocchieto या रिसॉर्टमध्ये हा विवाहसोहळा पार पडला.

विरुष्काच्या लग्नाला फक्त ४४ पाहुण्यांची हजेरी. या महिन्याअखेरीस मुंबईत रिसेप्शनचं आयोजन करणार. चित्रपट व्यापार विश्लेषक रमेश बालाची माहिती.

फिल्मफेअरच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर विराट- अनुष्काचे लग्न झाल्याची माहिती.

विराट-अनुष्काचा विवाहसोहळा संपन्न

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 11, 2017 6:49 pm

Web Title: bollywood actress anushka sharma and cricketer virat kohli italy wedding ceremony live updates
Next Stories
1 ‘फुकरे रिटर्न्स’ला यश मिळूनही का भडकली रिचा?
2 किंग खानला ‘जब हॅरी मेट सेजल’चा दुसऱ्यांदा फटका?
3 ‘१९२१’ सिनेमाचा ट्रेलर पाहून तुम्हीही घाबराल
Just Now!
X