News Flash

IIFA 2017 : आयफाच्या निमित्ताने विराट- अनुष्काचं आऊटिंग

गडबडीच्या वातावरणातही विराट अनुष्कालाच प्राधान्य देतोय

छाया सौजन्य- सोशल मीडिया

सध्या संपूर्ण बॉलिवूड विश्वात आयफा पुरस्कार सोहळ्यासाठी कलाकारांची लगबग पाहायला मिळतेय. विमानतळांपासून सोशल मीडियावर विविध बी- टाऊन सेलिब्रिटींच्या चर्चांनाही उधाण आलं आहे. यंदाचा आयफा पुरस्कार सोहळा न्यूयॉर्कमध्ये पार पडणार असल्यामुळे त्याचाही वेगळाच उत्साह दिसतोय. विविध सेलिब्रिटींनी आयफाच्या निमित्ताने न्यूयॉर्कची वाट धरलेली असतानाच काही सेलिब्रिटी आधीपासूनच तेथे पोहोचले असून आऊटिंगचा आनंद घेत आहेत. पण, या सेलिब्रिटींमध्ये एक अनपेक्षित चेहराही दिसला आहे. तो चेहरा म्हणजे क्रिकेटर विराट कोहलीचा.

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा याच्या रिलेशनशिपविषयी आता कोणतीही गोष्ट लपून राहात नाहीये. त्यात अशा महत्त्वाच्या कार्यक्रमांना अनुष्काची उपस्थिती पाहता विराटचं येणंही अनेकांना अपेक्षित असतं. पण, सध्या क्रिकेट वर्तुळातील गडबडीच्या वातावरणातही विराट अनुष्कालाच प्राधान्य देत आहे. हे नुकत्याच व्हायरल झालेल्या काही फोटोंमधून सिद्ध होतंय.

वाचा : ‘या’ अभिनेत्याची मुलगी शाहिद कपूरला मानत होती पती

‘विराट कोहली २०’ आणि ‘विराट कोहली फॅन क्लब’ इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन विरुष्काने न्यूयॉर्कमधील आऊटिंगचे फोटो पोस्ट करण्यात आले आहेत. या फोटोंमध्ये ते न्यूयॉर्कमध्ये फिरताना दिसत आहेत. यामध्ये अनुष्काने ऑफ शोल्डर टॉप आणि हॉट शॉट घातली असून विराटचाही नेहमीचा कॅज्युअल लूक पाहायला मिळतोय. त्यामुळे आता हे ‘विरुष्का’ आयफाच्या निमित्ताने आऊटिंगचा आनंद घेत आहेत असं म्हणायला हरकत नाही.

सध्या फक्त बॉलिवूडमध्येच नाही तर, न्यूयॉर्कमध्येही आयफाबद्दल उत्सुकतेचं वातावरण पाहाला मिळत आहे. आतपर्यंत सैफ अली खान, शाहिद कपूर, मीरा राजपूत, अनुष्का शर्मा आयफासाठी न्यूयॉर्कमध्ये गेले आहेत. सध्या बरेच कलाकार त्यांच्या वेळेप्रमाणे या सोहळ्यासाठी न्यूयॉर्कच्या दिशेने निघाल्याचं पाहायला मिळतंय. १४ आणि १५, १६ या तीन दिवसांमध्ये आयफा अंतर्गत विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 12, 2017 6:57 pm

Web Title: bollywood actress anushka sharma is in new york for iifa 2017 and giving her company is rumoured boyfriend cricketer virat kohli photos
Next Stories
1 ‘बिग बॉस ११’मध्ये होणार ढिंच्याक पूजाची एण्ट्री?
2 …म्हणून अर्जुन कपूर अजूनही ‘सिंगल’
3 अवघ्या ४८ मिनिटांतच एड शीरनचा मुंबई कॉन्सर्ट हाऊसफुल्ल!
Just Now!
X