News Flash

VIDEO : डरना जरूरी है! अनुष्काने साकारलेली ‘परी’ पाहून पुन्हा धडकीच भरेल

आणखी किती घाबरवणार 'परी'?

परी

‘सुई धागा’ या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र असणारी अनुष्का सध्या तिच्या ‘परी’ या चित्रपटाचंही जोरदार प्रमोशन करत आहे. सोशल मीडियाचा पुरेपूर वापर करत ‘परी’ या भयपटाचे जवळपास चार टीझर अनुष्काने आतापर्यंत प्रेक्षकांच्या भेटीला आणले होते. त्यातच आता आणखी एका व्हिडिओची भर पडली आहे. अवघ्या तीस सेकंदांच्या या व्हिडिओमध्ये सुरुवातीपासून ते अगदी शेवटपर्यंत ‘परी’वरच सर्वांच्या नजरा खिळत आहेत.

अनुष्काने पोस्ट केलेल्या या टीझर/ स्क्रीमरची सुरुवात एका घनदाट जंगलापासून होते. ज्यामध्ये रात्रीच्या नीरव शांततेत अनुष्का कुठल्यातरी गोष्टीच्या शोधात निघाल्याप्रमाणे चालत जाताना दिसतेय. पुढच्याच दृश्यात ती एका तलावापाशी पोहोचते आणि पाण्यात तिला स्वत:च्याच जखमी चेहऱ्याचे प्रतिबिंब पाहायला मिळते. ही दृश्य पाहात असताना पार्श्वसंगीतामुळे भीती एका वेगळ्याच पातळीवर पोहोचत असून, पाहणाऱ्यांना धडकी भरल्यावाचून राहात नाहीये.

मुख्य म्हणजे हा स्क्रिमर पोस्ट करण्यापूर्वी अनुष्काने तिच्या इन्टाग्राम अकाऊंटवरुन एक फोटो पोस्ट केला. परीच्या पोस्टरच्या या फोटोमध्ये पुन्हा एकदा परी घाबरवून गेली. रक्ताने माखलेला तिचा चेहरा आणि एखाद्या गोष्टीवर रोखलेली तिची नजर पाहता भयपटाच्या सर्व चौकटी ओलांडत अनुष्का प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे हे खरं.

VIDEO: धोनीचा संयम सुटला, मनिष पांडेबद्दल अपशब्द वापरला

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्रसित रॉय दिग्दर्शित ‘परी’चं चित्रीकरण कोलकाता आणि मुंबईत करण्यात आलं आहे. तेव्हा या दोन शहरांमध्येच हा भयपट उलगडत जातो की आणखी कोणतं वळण घेतो हे पाहणं हे येत्या काळात कळेलच. दरम्यान, ‘फिल्लौरी’ आणि ‘एनएच १०’ या चित्रपटांनंतर अनुष्का शर्मा ‘परी’च्या निमित्ताने पुन्हा एकदा चित्रपट निर्मितीत सक्रीय झाली असून, २ मार्चला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 23, 2018 11:27 am

Web Title: bollywood actress anushka sharma paranormal activities in movie pari will make you lose your sleep see a new teaser video
Next Stories
1 रिअॅलिटी शोमधील अल्पवयीन मुलीचे चुंबन घेतल्याप्रकरणी पपॉनविरोधात तक्रार दाखल
2 बनावट आधार कार्ड दाखवून अभिनेत्रीच्या घरी चोरी
3 फ्लॅशबॅक : ‘बटवारा’ आणि जे. पी. दत्ताची खासियत…
Just Now!
X