02 March 2021

News Flash

PHOTO : अनुष्का, फक्त तुझ्यासाठी…

सामन्यात मिळालेल्या विजयनंतर कर्णधार म्हणून विराटने त्याचं मनोगत व्यक्त करत हा विजय आपल्या संघासाठी किती महत्त्वाचा होता हे स्पष्ट केलं.

विराट, अनुष्का

आयपीएलच्या ११ व्या हंगामात काही मोठ्या संघाच्या वाटेत विजय मिळवण्यासाठी बऱ्याच अडचणी येत असल्याचं पाहायला मिळत आहेत. त्यातीलच दोन संघ म्हणजे मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु. या दोन्ही संघामध्ये मंगळवारी एक सामना खेळला गेला ज्यामध्ये दोन्ही संघांना विजयी सूर गवसणं तितकंच महत्त्वाचं होतं. पण, यात बाजी मारली ती म्हणजे विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखाली खेळण्यासाठी उतरलेल्या आरसीबीच्या संघाने. मुंबईच्या खेळाडूंना नमवत विराटच्या ब्रिगेडने या सामन्यात विजयी छाप सोडली. बंगळुरुच्या चिन्नस्वामी स्टेडियमध्ये खेळला गेलेला हा सामना विराटसाठी जरा जास्तच खास होता. त्याचं कारण म्हणजे त्याच्या पत्नीचा म्हणजेच अभिनेत्री अनुष्का शर्माचा वाढदिवस.

आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने अनुष्काही बंगळुरूच्या त्या स्टेडियमवर विराटला आणि आरसीबीच्या संघाला प्रोत्साहन देण्यासाठी दाखल झाली होती. तिची उपस्थिती या सामन्याला खऱ्या अर्थाने ‘चार चाँद’ लावून गेली असं म्हणायला हरकत नाही. त्यातही तिचा वाढदिवस असल्यामुळे विराट सामना जिंकत आपल्या पत्नीला खास भेट देणार का, याविषयीची कमालीची उत्सुकता क्रीडारसिकांमध्ये पाहायला मिळाली होती. विराटनेही त्याला मिळालेल्या या संधीचं सोनं करत सामन्यात अपेक्षित यश संपादन केलं. सामना संपल्यानंतर ज्यावेळी प्रेझेंटेशन सेरेमनीमध्ये विराट त्याचं मनोगत व्यक्त करत होता, तेव्हाही अनुष्कावरुन त्याची नजर हटत नव्हती.

सामन्यात मिळालेल्या विजयनंतर कर्णधार म्हणून विराटने त्याचं मनोगत व्यक्त करत हा विजय आपल्या संघासाठी किती महत्त्वाचा होता हे स्पष्ट केलं. त्यासोबतच संघातील खेळाडूंचंही त्याने कौतुक केलं. या साऱ्यामध्ये तो आपल्या पत्नीचा म्हणजेच अनुष्काला उल्लेख करायला विसरला नाही. ‘माझी पत्नीही आज इथे उपस्थित आहे. आज तिचा वाढदिवस आहे. मला फारच आनंद होतोय, की ती आज इथे उपस्थित आहे आणि आम्ही हा सामना जिंकला आहे’, असं विराट म्हणाला. त्यावेळी अनुष्कावरही कॅमेराची नजर खिळली असता तिच्या चेहऱ्यावरुन ओसंडून वाहणारा आनंद सर्वांनाच पाहायला मिळाला. अनुष्काच्या चेहऱ्यावर खुललेलं स्मितहास्य बरंच काही सांगून गेलं. ज्यानंतर सोशल मीडियावर पुन्हा एकदा या सेलिब्रिटी कपलच्याच चर्चा रंगल्या.

वाचा : UPSC results: मदरशातील शिक्षकाची यशोगाथा, जिंकली केंद्रीय लोकसेवा आयोगाची शर्यत

वाढदिवसाच्या निमित्ताने संघाला विजय मिळवून देत खास भेट देणाऱ्या आपल्या पतीचे अनुष्काने एका इन्स्टा पोस्टद्वारे आभार मानले. ‘आतापर्यंतचा सर्वात खास वाढदिवस एका खास, प्रामाणिक आणि धाडसी व्यक्तीसोबत मी साजरा केला आहे. या दिवसाला आणखी खास करण्यासाठी मी तुझे मनापासून आभार मानते’, असं लिहित तिने विराटसोबतचा एक सुरेख फोटो पोस्ट केला. ज्यामध्ये हे दोघंही अनुष्काचा बर्थडे सेलिब्रिट करताना दिसत होतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 2, 2018 12:12 pm

Web Title: bollywood actress anushka sharma thanks virat kohli for making her birthday special he dedicates his win to her
Next Stories
1 मी माझ्या पत्नीची साथ देणारच, ‘त्या’ वादांनंतर अक्षयने केली ट्विंकलची पाठराखण
2 ‘१०२ नॉट आऊट’च्या स्क्रिनिंगसाठी ‘या’ खास व्यक्तीची हजेरी
3 ‘अ‍ॅव्हेंजर्स : इन्फिनिटी वॉर’ पाहताना कामगाराचा मृत्यू
Just Now!
X