23 November 2017

News Flash

‘ही’ निरागस चिमुरडी आजही जिंकतेय सर्वांचे मन

ओळखा पाहू ही कोण

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: September 14, 2017 6:54 PM

बिपाशा बासू

‘थ्रोबॅक थर्सडे’ हा ट्रेंड गेल्या काही दिवसांपासून बराच चर्चेत आहे. एखादी जुनी आठवण, फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत पुन्हा एकदा गतकाळामध्ये रममाण होणाऱ्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढच होत आहे. या ट्रेंडचं सर्वाधिक वेड कलाविश्वात पाहायला मिळतंय. बरेच सेलिब्रिटी त्यांचे काही जुने फोटो पोस्ट करुन आठवणींमध्ये रममाण होत असतात. यामध्ये अभिनेत्री बिपाशा बासूसुद्धा मागे नाही.

सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असणाऱ्या अभिनेत्री बिपाशा बासूने नुकताच इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केलाय. ‘गेस व्हू…’, असं कॅप्शन देत तिने हा फोटो पोस्ट केलाय. फोटोमध्ये असणारी ती चिमुकली मुलगी आणि तिच्या चेहऱ्यावर खुललेलं ते निरागस हास्य पाहून अनेकजण तिच्यावर भाळले आहेत. ‘ओळखा पाहू ही कोण’, असं म्हणत बिपाशाने शेअर केलेला फोटो दुसऱ्या कोणाचा नसून तिच्याच बालपणीचा आहे.

Guess who?

A post shared by bipashabasusinghgrover (@bipashabasu) on

Collecting love and blessings ❤️ Beautiful outfit by @anitadongre and jewels by @bellezajewels .

A post shared by bipashabasusinghgrover (@bipashabasu) on

पाहा : Photos : स्वत:चा हा लूक पाहून थक्क झाली बिपाशा

या फोटोमध्ये ती एखाद्या मॉडेलप्रमाणेच पोझ देत असून, कॅमेराकडे एकटक पाहताना दिसतेय. हा फोटो पाहता बालपणीपासूनच तिला कॅमेरासमोर आत्मविश्वासाने उभं राहण्याची सवय असल्याचं स्पष्ट होतंय. बॉलिवूडची ‘डस्की ब्युटी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बिपाशाने चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वी मॉडेलिंगमध्ये यश मिळवलं होतं. ‘जिस्म’, ‘राझ’, ‘अजनबी’ आणि ‘धूम’ या चित्रपटांमध्ये तिने साकारलेल्या भूमिकांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.

First Published on September 14, 2017 6:54 pm

Web Title: bollywood actress bipasha basu shared her childhood photograph on this throwback thursday