News Flash

लॉकडाउनमध्ये बिपाशाची विनामेकअप लूकला पसंती

पाहा, विनामेकअपमध्ये बिपाशा कशी दिसते

एकेकाळी आपल्या अभिनयासोबतच हॉटनेसने अनेकांच्या मनावर राज्य करणारी बोल्ड अभिनेत्री म्हणजे बिपाशा बासू. मात्र आता बिपाशाचा  कलाविश्वातील वावर कमी झाला आहे. तरीदेखील ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या कायम संपर्कात असते. सध्या लॉकडाउन सुरु असल्यामुळे बऱ्याच वेळा ती इन्स्टाग्राम,फेसबुक या सारख्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधत आहे. तसंच तिच्याविषयी अनेक गोष्टी शेअर करत आहे. यातच तिने अलिकडे एक नो मेकअप लूक शेअर केला होता. विशेष म्हणजे तिच्या या लूकला पसंती मिळत आहे.

बिपाशाने घरात बसून एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत तिने मेकअप केला नसून स्वत:ला ब्राऊन ब्युटी असं संबोधलं आहे. तिने हा फोटो शेअर केल्यानंतर अनेकांनी तिचं कौतूक केलं असून या वयातही तू तुझा फिटनेस आणि चेहऱ्यावरील ग्लो कायम ठेवला आहेस, असं अनेकांनी म्हटलं आहे.

 

View this post on Instagram

 

Brown Girl = Me #loveyourself #meandmymat

A post shared by bipashabasusinghgrover (@bipashabasu) on


दरम्यान, लॉकडाउन असल्यामुळे घरात अडकलेली बिपाशा सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत आहे. अलिकडेच तिने आणि पती करणसिंग ग्रोवरने त्यांच्या लग्नाचा चौथा वाढदिवस साजरा केला. यावेळी बिपाशाने स्वत:च्या हाताने बेसनाचे लाडू तयार केले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 25, 2020 10:59 am

Web Title: bollywood actress bipasha basu shares makeup free photo ssj 93
Next Stories
1 मदतकार्य पाहून भारावला विकास खन्ना; सोनू सूदसाठी तयार केली खास ‘मोगा डिश’
2 ‘त्या’ मुलाखतीत सुनील दत्त नर्गिससमोर एक शब्दही बोलू शकले नव्हते
3 अरेच्चा हे काय?; ‘गुलाबो सिताबो’मधील बिग बींगच्या पात्रासारखे दिसणारे आजोबा चर्चेत
Just Now!
X