16 December 2017

News Flash

‘प्यार मे कभी कभी ऐसा हो जाता है’

दीपिका- रणवीरच्या प्रेमाचा हा किस्सा तुम्हीही पाहावा असाच आहे

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: May 18, 2017 7:08 PM

दीपिका आणि रणवीर

बॉलिवूडचं मोस्ट हॅपनिंग कपल म्हणून गेल्या बऱ्याच दिवसांपासून दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांच्याकडे पाहिलं जात आहे. संजय लीला भन्साळी यांच्या रामलीला या चित्रपटात एकत्र काम केल्यानंतर या जोडीमध्ये जवळीक वाढली आणि तेव्हापासूनच त्यांच्या ऑनस्क्रीन केमिस्ट्रीला प्रेक्षकांनी चांगलाच प्रतिसाद दिला. ‘रामलीला’पासून दीपिका-रणवीरमध्ये वाढलेली जवळीक, बऱ्याच कार्यक्रमांना त्यांचं एकत्र जाणं या सर्व गोष्टी त्यांच्या प्रेमप्रकरणाच्या चर्चांना हवा देत होतं. त्यातच हा व्हिडिओ पाहून रणवीर-दीपिकाच्या प्रेमाची एक वेगळी बाजू आपल्याला पाहायला मिळत आहे.

सोशल मीडियावरही हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ‘बॉलिकॅथोलिक’ या इन्स्टाग्राम पेजवरुन शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओमध्ये रणवीर ज्याप्रमाणे दीपिकाचे इयरिंग्समध्ये गुंतलेले केस अगदी प्रेमाने मोकळे करतोय ते नक्कीच पाहण्यासारखं आहे. मुख्य म्हणजे यावेळी दीपिका एका पत्रकाराशी संवाद साधत असतानाही रणवीरला मात्र त्याचं काहीच भान नाहीये.

बॉलिवूडमध्ये रणवीर-दीपिका आता त्यांच्या कारकिर्दीच्या प्रगतीपथावर असून, प्रेक्षकांच्या मनात त्यांनी चांगलच स्थान मिळवलं आहे. या दोघांभोवती सतत चाहत्यांचा गराडा असल्यामुळे त्यांच्यावर नेहमीच सर्वांच्या नजरा खिळलेल्या असतात. सध्याच्या घडीला हे दोन्ही कलाकार संजय लीला भन्साळी यांच्या ‘पद्मावती’ या चित्रपटामध्ये स्क्रिन शेअर करणार आहेत. या चित्रपटाच्या चित्रीकरणातूनच वेळ काढत दीपिकाने नुकतीच कान फिल्म फेस्टिव्हलला हजेरी लावली. यामध्ये दीपिकाच्या रेड कार्पेट लूकला अनेकांनीच पसंती मिळाली आहे.

First Published on May 18, 2017 7:08 pm

Web Title: bollywood actress deepika padukone and ranveer singh couple celebrity rumored couple