News Flash

#JNUViolence: “जे काही सुरु आहे ते संतापजनक,” दीपिकाची पहिली प्रतिक्रिया

जेएनयूच्या हिंसाचारावर बोलताना दीपिकाने संताप व्यक्त केला

दीपिका पादुकोन त्या फार कमी बॉलिवूड सेलिब्रेटींपैकी एक आहे ज्यांनी उघडपणे जेएनयू विद्यापीठात झालेल्या हिंसाचाराचा विरोध केला आहे. रविवारी रात्री जेएनयू कॅम्पसमध्ये घुसखोरी करत काहीजणांनी विद्यार्थी आणि प्राध्यापकांना मारहाण केली होती. यानंतर देशभरात आंदोलन सुुर असून मंगळवारी दीपिका जेएनयूबाहेर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना भेटण्यासाठी आणि पाठिंबा देण्यासाठी पोहोचली होती. यावेळी तिने जेएनयू विद्यार्थी संघटनेची अध्यक्ष आयेशी घोष हिची भेटदेखील घेतली.

आणखी वाचा – #JNURow: दीपिका एक शब्दही न बोलता निघून गेली, आयेषी घोष म्हणते….

आजतक वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत दीपिकाने विद्यापीठांमध्ये विद्यार्थ्यांवर होणाऱ्या हल्ल्यांवर भाष्य केलं. सध्याच्या परिस्थितीबाबत विचारलं असता तिने सांगितलं की, “जे मला बोलायचं होतं ते मी दोन वर्षांपुर्वी पद्मावत चित्रपट रिलीज होताना बोलले होते. आज जे काही चित्र आहे ते पाहून दु:ख होत आहे. याची सवय होऊ नये असंच वाटतं. कोणीही काहीही बोलणार आणि त्यातून निसटणार असं होऊ नये. मला भीती वाटत असून दु:खी आहे. हा आपल्या देशाचा पाया नाही”.

जेएनयूच्या हिंसाचारावर बोलताना दीपिकाने संताप व्यक्त केला. “जे काही सुरु आहे त्याचा प्रचंड राग आहे. पण त्यापेक्षाही जास्त वाईट गोष्ट म्हणजे कोणतीही कारवाई केली जात नाही आहे”.

आणखी वाचा – #boycottchhapaak: दीपिकाविरोधात नेटकरी आक्रमक, चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी

दीपिका आपला आगामी चित्रपट ‘छपाक’च्या प्रमोशनसाठी दिल्लीत आहे. हा चित्रपट मेघना गुलजार यांनी दिग्दर्शित केला असून अॅसिड हल्ल्यातून बचावलेल्या लक्ष्मी अग्रवालच्या आयुष्यावर आधारित आहे. दीपिकाने जेएनयूमधील आंदोलनात उपस्थिती लावताच ट्विटरवर संमिश्र प्रतिक्रिया उमटू लागल्या. काहीजणांनी तिच्या चित्रपटावर बहिष्कार घालण्याची मागणी करत #boycottchhapaak हॅशटॅग सुरु केला. तर काहीजणांनी #ISupportDeepika हॅशटॅग वापरत तिच्या भूमिकेला समर्थन दिलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 8, 2020 1:06 pm

Web Title: bollywood actress deepika padukone chhapaak reaction on jnu violence sgy 87
टॅग : JNU Issue,JNU Row
Next Stories
1 मृत्यृनंतरही ‘हा’ रॉकस्टार कमावतो वर्षाला २८१ कोटी रुपये
2 Photo : ‘श्वास’ चित्रपटातला चिमुकला आठवतोय? पाहा आता कसा दिसतो
3 भांडी धुण्यासाठी सलमानला मिळाले ६०० कोटी; स्पर्धकाचा दावा
Just Now!
X