18 March 2019

News Flash

कतरिनामुळे दीपिकाने बदलली तिची वाट?

दीपिका आणि कतरिनामध्ये काही आलबेल नसल्याचं पाहिलं गेलं.

दीपिका पदुकोण, कतरिना कैफ

दीपिका पदुकोण आणि रणबीर कपूर यांच्या नात्याचं समीकरण आता पहिल्याप्रमाणे नसलं तरीही त्यांच्यात मैत्रीचं नातं मात्र टीकून आहे. एकेकाळी बॉलिवूडच्या बहुचर्चित कपल्सच्या यादीत गणल्या जाणाऱ्या रणबीर आणि दीपिकाच्या नात्यात दुरावा येण्याचं कारण म्हणजे अभिनेत्री कतरिना कैफ, असाच अनेकांचा समज होता. सूत्रांनी दिलेली माहिती आणि कलाविश्वात होणाऱ्या चर्चा पाहता कतरिनासाठीच रणबीरने दीपिकापासून दूर जाण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हापासूनच दीपिका आणि कतरिनामध्येही काही आलबेल नसल्याचं पाहिलं गेलं.

करण जोहरच्या चॅट शोपासून, ते अगदी माध्यमांशी मारलेल्या गप्पा असो. दीपिकाच्या बोलण्यातून नेहमीच कतरिनाप्रती मनात असणारी द्वेषाची भावना कधीच लपली नाही. किंबहुना दीपिकाने नेहमीच कतरिनाला टाळल्याचं पाहायला मिळालं. मुख्य म्हणजे पुन्हा एकदा त्यांच्यातील हा दुरावा पाहायला मिळाला. लंडन दौऱ्यावर जाण्यापूर्वी दीपिकाने शारीरिक सुदृढतेकडे पुन्हा एकदा जातीने लक्ष देण्यास सुरुवात केली असून, त्यासाठीच ती जीममध्ये गेली होती. मुळात गेल्या काही दिवसांपासून ती पाठदुखीच्या दुखण्यानेही त्रस्त आहे. त्यामुळे या सर्व परिस्थितीत जीमला जाण्याचा पर्याय निवडत ती यास्मिन कराचीवालाच्या सेलिब्रिटी फिटनेस स्टुडिओमध्ये गेली.

Women’s Day 2018 : ‘तिच्या’ नाईट आऊटची गोष्ट

‘स्पॉटबॉय ई’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार जीममध्ये जाण्यापूर्वीच तिने तिथून परतण्याचा निर्णय घेतला. दीपिकाने जीमच्या बाहेर उभ्या असलेल्या कतरिना कैफच्या कारचा नंबर अचूकपणे हेरला आणि पुढे न जात तिथूनच आपली कार मागे घेत त्या ठिकाणहून परतण्याचा निर्णय घेतला. कोणत्याही कारणाने का असेना, कतरिनाशी आमनासामना टाळत झाल्या गोष्टी शक्यतो आपल्यापासून दूर ठेवण्यालाच दीपिका प्राधान्य देत असल्याचं स्पष्ट होत आहे.

पाहा : VIDEO : अबॉटच्या ‘या’ उसळत्या चेंडूमुळे दुर्दैवी आठवणींना पुन्हा जाग

दरम्यान, रणबीरसोबतच्या नात्यात दुरावा आल्यानंतर दीपिकाचं नाव अभिनेता रणवीर सिंगशी जोडलं गेलं. ती गेल्या बऱ्याच वर्षांपासून अभिनेता रणवीर सिंगला डेट करत असल्याच्या चर्चा बॉलिवूड वर्तुळात रंगत आहेत. येत्या काही दिवसांमध्ये हे मोस्ट हॅपनिंग कपल त्यांच्या नात्याची अधिकृत घोषणा करुन विवाहबंधनात अडकणार असल्याच्याची चर्चांनी जोर धरला आहे. त्यामुळे चाहत्यांचीही नजर याच एका गोष्टीकडे लागून राहिली आहे असं म्हणायला हरकत नाही.

First Published on March 8, 2018 3:14 pm

Web Title: bollywood actress deepika padukone did to avoid ranbir kapoors ex girlfriend katrina kaif